अनिल परब-शरद पवार वरळीत भेटले!

अनिल परब-शरद पवार वरळीत भेटले!

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची वरळीतील नेहरू सेंटरमध्ये भेट झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप हाच या बैठकीचा विषय असण्याची शक्यता आहे. जवळपास तासभर झाल्यानंतरही ही बैठक सुरू असल्यामुळे या संपाबाबत तोडगा काढण्याचा मार्ग या बैठकीच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न होईल, अशी शक्यता आहे.

गेले काही दिवस महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचारी संपावर आहेत. आझाद मैदान येथे मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे भाजपा नेते या कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होऊन सरकारला विलिनीकरण करण्याची मागणी करत आहेत. मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही.

एसटी कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे राज्यातील संपूर्ण एसटी ठप्प असून प्रवाशांचे हाल होत आहेत मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मात्र खूप गंभीर आहेत. गेल्या काही महिन्यात तर एसटी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नाही. त्यासाठी एसटी महामंडळाला सरकारकडून मिळालेल्या मदतीच्या आधारे ही वेतनाची गरज भागविली जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन पाहिले तर ते इतर राज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ती एसटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. त्यासाठीच एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करा आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन व इतर सुविधा द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.

 

हे ही वाचा:

पठाणकोटमधील आर्मी कॅम्पवर ग्रेनेड हल्ला

अभिनंदन! अभिनंदनचा वीर चक्रने सन्मान

सांभाळा तुमचे मेटाबॉलिझम! नाहीतर…

लेडीज पर्समध्ये लपवले होते ५ कोटींचे ड्रग्ज

 

आतापर्यंत अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न अधिकच चिघळला आहे. त्यासाठीच हे आंदोलन गेले काही दिवस सुरू आहे. मात्र त्यावर तोडगा काढण्याऐवजी एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे. आतापर्यंत दोन हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. काही रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची  सेवाही समाप्त करण्यात आली आहे.

Exit mobile version