शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?

शरद पवारांचे काँग्रेसला थेट आव्हान, तरीही आघाडीत सर्वकाही आलबेल?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा पुन्हा नव्याने प्रयत्न होऊ शकतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचे कालच संकेत दिले आहेत. पवारांनी अल्टरनेटीव्ह प्रोग्रेसिव्ह मंच निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षातच काँग्रेस एकाकी पडणार की काय? असा सवाल केला जात आहे.

शरद पवार यांनी काल त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देशाला तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचं म्हटलं आहे. तिसऱ्या आघाडीसाठी विविध पक्षांशी चर्चा सुरू आहे. कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांनीही तिसरी आघाडी बनवण्यावर जोर दिला आहे. टीएमसीच्या नेत्या ममता बॅनर्जींनीही तिसरी आघाडी निर्माण करण्यावर जोर दिला आहे. मात्र, तिसऱ्या आघाडीला आकार दिला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल सारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्वाकडून हल्लाबोल सुरू आहे. त्यामुळे अशावेळी लोकशाहीवादी पक्षांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला पाहिजे. येचुरी यांचा फोन आला होता. अल्टरनेटीव्ह मंच निर्माण करण्याची गरज आहे. त्याबाबत विचार करा. आपण किमान समान कार्यक्रम तयार करू. त्यात काहीच अंतर्विरोध नाही, असं येचुरी यांनी म्हटल्याचं पवारांनी सांगितलं होतं. अनेक नेत्यांनी पर्यायी आघाडी निर्माण करण्याचा आग्रह धरला आहे. त्यावर गंभीरपणे विचार सुरू आहे, असं पवारांनी काल म्हटलं होतं.

हे ही वाचा:

तुम्ही गृहमंत्री होणार का? या प्रश्नावर काय म्हणाले जयंत पाटील?

अमृता फडणविस यांनी केले ठाकरे सरकारला लक्ष्य

मुंबईत कोविडचे थैमान सुरु असताना आदित्य ठाकरे सुट्टीवर?

मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करण्यात यावी, भाजपा नेत्याची मागणी

दरम्यान, मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाचा विरोध करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येण्यास अनेक प्रादेशिक पक्ष तयार नाहीत. आता हे प्रादेशिक पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल काय लागतो, त्यावर या आघाडीचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे.

Exit mobile version