शरद पवारांनी पुन्हा बाबासाहेब पुरंदरेंचा मुद्दा काढला उकरून

शरद पवारांनी पुन्हा बाबासाहेब पुरंदरेंचा मुद्दा काढला उकरून

बाबासाहेब पुरंदरे यांनी एका भाषणा जेम्स लेनचे कौतुक केले होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेसंदर्भातही त्यांनी एका पत्रातून माफी मागितली होती, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पुन्हा एकदा या विषयाला तोंड फोडले. जळगावमध्ये दौऱ्यानिमित्त गेलेल्या पवारांनी या विषयाला पुन्हा हात घातला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याबाबत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले की, तुम्ही प्रश्न विचाराल असे वाटले नव्हते पण माझ्याकडे सुदैवाने त्यासंदर्भातील कागद आहेत तेव्हा मी उत्तर देतो, असे सांगत बाबासाहेब पुरंदरे यांनी लेनचे कौतुक केल्याचे दाखविणारी एक बातमी वाचून दाखविली.

शरद पवार म्हणाले की, लेनने गलिच्छ लेखन केले आहे.पण त्याबाबत बाबासाहेब पुरंदरेंनी केलेल्या भाषणात त्यांनी लेनचे कौतुक केले. लेन हा चांगला शिवअभ्यासक आहे, असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, असे बातमीत म्हटले आहे. त्यावेळी महाराष्ट्रात चीड व्यक्त केली गेली. त्यानंतर शिवजयंती कधी करावी जन्मतिथीने की इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे करावी, याविषयी वाद होता. ५ फेब्रुवारी २००१चे बाबासाहेब पुरंदरे यांचे पत्र आहे की, शिवजयंती तारखेप्रमाणे करावी असा सल्ला मी सरकारला दिला होता पण कालनिर्णयकार जयंतराव साळगावकरांशी चर्चा करताना ती तिथीप्रमाणे करावी असे म्हटले होते. त्यावरून शिवभक्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण झाले. शिवभक्तांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो.

शरद पवारांनी बाबासाहेब पुरंदरेंचा मुद्दा कसा पेटत राहील याची काळजी घेतली.

हे ही वाचा:

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या दोघांना अटक

रामनवमीच्या गदारोळानंतर जेएनयूमध्ये फडकले भगवे झेंडे

‘प्रवीण कलमे कुठे आहेत हे जितेंद्र आव्हाड सांगणार आहेत का?’

‘देशातल्या मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटायची’

 

राज ठाकरे यांनी ठाण्यात केलेल्या भाषणाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, समाजातील ऐक्य संकटात येईल अशी चिंता वाटते. काही झाले तर महाराष्ट्र एकसंध ठेवला पाहिजे. सर्वधर्म जाती यात सामंजस्य असले पाहिजे. त्याला पोषक भूमिका घ्यायची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्याच्यापासून बाजूला जाऊ की काय अशी आज स्थिती आहे.

राज ठाकरेंच्या पोस्टर्सवर हिंदुजननायक असे लिहिण्यात येत आहे, त्यावर पवार म्हणाले की, त्यांची भूमिका दिसते की, त्यांचे भाष्य ऐकल्यावर दिसते की,ते हिंदुत्वाच्या रस्त्यावर जात आहेत. प्रत्येकाची दिशा असते. त्यांनी तो मार्ग निवडला असेल. मात्र काळजी एकच आहे सामाजिक ऐक्य संकटात येऊ नये.

मी ती ट्विट एन्जॉय करतो!

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकर जयंतीला केलेल्या १४ ट्विटसंदर्भात पवारांना विचारल्यावर ते म्हणाले की, मी ही ट्विट्स एन्जॉय करतो.

पवारांवर जातीयवादी असल्याचा आरोप होत असताना त्याचे खंडन करताना पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला तेव्हा अध्यक्ष छगन भुजबळ होते. नंतर मधुकरराव पिचड, अरुण गुजराथी, तटकरे ही समाजातील सगळ्या घटकांना घेऊन जाणारी आहेत. एका जातीपुरती सीमित नाहीत. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून आरोप करतात.

वीजेच्या प्रश्नावर ते म्हणाले की,  वीजेचा प्रश्न हा राष्ट्रीय झाला आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी गंभीर विचार केलेला आहे.

Exit mobile version