निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. “मी आरएसएसला संघ परिवार म्हणणार नाही. कारण संघात महिलांचा आणि बुजुर्गांचा सन्मान होत नाही.” असं विधान राहुल गांधींनी केलं आहे. यावरच टीका करत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपचे प्रभारी अतुल भातखळकरांनी ट्विट केले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या काळातील काँग्रेसमधील महिला आणि बुजुर्गांवरील अत्याचाराच्या पापाचा पाढाच भातखळकरांनी वाचून दाखवला आहे.

मला वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी संबंधित संघटनांना परिवार म्हणणे योग्य नाही. कुटुंबात महिला असतात. बुजुर्गांचा सन्मान होतो. करुणा आणि स्नेहाची भावना असते. संघात नेमकी त्याचीच वानवा आहे. त्यामुळे आता मी संघाला संघ परिवार म्हणणार नाही, असं राहुल यांनी म्हटलं आहे. यापूर्वी राहुल यांनी संघाशी संबंधित शाळांची तुलना पाकिस्तानच्या कट्टर इस्लामिक मदरशांशी केली होती. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचं वादळ उठलं होतं.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?

कुणाच्या खांद्यावर वाझेचे ओझे…कौशल इनामदार यांचे भन्नाट विडंबन

मंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? – अतुल भातखळकर

“राहुल गांधींच्या दिव्य अज्ञानाबद्दल काय बोलावे? यांना राष्ट्र सेविका समिती, दुर्गा वाहिनी काहीच माहीत नाही. मनेका गांधींचे सामान रातोरात घराबाहेर फेकणारे, सीताराम केसरीना धक्के मारून हाकलणारे,डॉ.मनमोहन सिंह यांचा वटहुकूम फाडणारे निर्लज्ज महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत.” असे ट्विट अतुल भातखळकरांनी केले आहे.

राहुल गांधीनी गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदींची तुलना गद्दाफी आणि सद्दाम हुसेन या हुकूमशहांशीही केली होती. ज्यावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर टीकेचा भडीमार केला होता.

Exit mobile version