24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणछगन भुजबळांना समज द्या! अजित पवारांकडे शंभूराज देसाईंची मागणी!

छगन भुजबळांना समज द्या! अजित पवारांकडे शंभूराज देसाईंची मागणी!

ओबीसी - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संभ्रम

Google News Follow

Related

मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास मंत्री छगन भुजबळ विरोध करत आहेत.मात्र, नुसतं विरोध करत नसून मंत्री छगन भुजबळ हे भडक वक्तव्य करत समाजामध्ये आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावं, अशी मागणी शिंदे गटाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.पुढच्या दाराने आरक्षण मिळत नाही, त्यामुळे ओबीसीमधून आरक्षण म्हणजे मागच्या दारातून वाट मिळवण्याचा प्रयत्न आहे. तसंच मनोज जरांगे यांना न्यायाधीश जाऊन भेटतात त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही.मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अन्यथा ओबीसींनी रस्त्यावर उतरुन विरोध करावा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं होतं.यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, “काल आमचे सहकारी मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असे आश्चर्यकारक वक्तव्य केले. ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे हे मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट झाले आहे. अचानक भुजबळ यांनी असे वक्तव्य केले त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे, असे शंभूराज देसाई म्हणाले.

हे ही वाचा:

रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!

दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स

छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट

ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांचे सर्व कागदपत्रे तपासून त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरले आहे.त्यामुळे कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.उद्या मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीपूर्वी आम्ही आमची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालू. मी काही तरी केलं आणि तुमचं थांबवले असे भुजबळ यांना दाखवायचं आहे का? असा संभ्रम ते करत आहेत की काय? त्यांनी केलेल वक्तव्य अयोग्य आहे, असं शंभूराज देसाईंनी म्हटले.ओबीसींच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. ओबीसींचे काढून आम्ही आरक्षण देणार असा विचारच आमच्या मनात नाही, असं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं.

भुजबळांची वक्तव्ये नेहमीच भडक
छगन भुजबळ जे अशी भडक वक्तव्य करत ते अयोग्य आहेत.तुमचे जे काही म्हणणे असेल ते तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडा, परंतु असं माध्यमांसमोर बोलू नका.भडक वक्तव्ये करणारी भूमिका भुजबळ यांची नेहमीची असते. पण आता त्यांनी असे करू नये. अजितदादा यांनी याकडे लक्ष द्यायला हवे. आम्ही अजितदादांना उद्या भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की अशी वक्तव्य करू नये, अशी आक्रमक भूमिका शंभूराज देसाईंनी घेतली.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा