नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्कालिन गृहमंत्री शंभूराज देसाई यांना दूरध्वनी करून झेड प्लस सुरक्षा नाकरण्याची सूचना केली होती असा गंभीर आरोप आमदार सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. दरम्यान आमदार शंभुराज देसाई यांनीही नाशिकचे आमदार कांदे यांनी केलेल्या आरोपाला दुजोरा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती. गुप्तचर यंत्रणांनीही तसा अहवाल दिला होता. परंतु, तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना सुरक्षा पुरवली नाही. त्यांना झेड सुरक्षेची गरज असतानाही ती नाकारण्यात आल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे. दरम्यान, या आरोपाबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार रावसाहेब दानवे यांनी मातोश्रीवरून फोन केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. झेड, झेड प्लस, वाय सुरक्षा पुरवण्याचा विषय केंद्राचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात
पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट
द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार
महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी
शिवसेनेचे नेते, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रा सुरू आहे. त्यांची ही यात्रा आज मनमाडमध्ये पोहचली आहे. नांदगावचे आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पाच हजार कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार होते. परंतु या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले.