विशाळगडावरील आंदोलकांना शाहू छत्रपती म्हणाले ‘अतिरेकी?’

व्हीडिओ झाला व्हायरल

विशाळगडावरील आंदोलकांना शाहू छत्रपती म्हणाले ‘अतिरेकी?’

विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आघाडी उघडल्यानंतर तेथे काही लोकांनी तोडफोड केल्याचे प्रकरण समोर आले. त्यानंतर तेथील दर्गा, मशिद यांची पाहणी करण्यासाठी कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती पोहोचले होते. त्यावेळी तेथील मुस्लिमांनी आपले म्हणणे त्यांना ऐकवले. तेव्हा एकाने त्यांना सांगितले की, गडावर जी तोडफोड झाली, ती करणारे शिवभक्त होते का, की अतिरेकी होते. त्यांना शिवभक्त म्हणता येईल का, तेव्हा शाहूंनीही त्याच्या सुरात सूर मिसळत त्यांना अतिरेकी संबोधले. तेव्हा त्या मुस्लिम व्यक्तीने मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत असून त्यावरून खासदार शाहू छत्रपतींवर टीका होत आहे.

शाहू छत्रपतींसोबत तेथील आमदार सतेज पाटीलही उपस्थित होते. विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात गेले काही दिवस तीव्र आंदोलने सुरू असून ही अतिक्रमणे ताबडतोब पाडली जावीत अशी मागणी केली जात आहे.

स्वतः माजी खासदार आणि शाहू छत्रपती यांचे पुत्र संभाजी राजे यांनीही विशाळगडावर जाऊन आंदोलन केले होते. तेव्हा ही तोडफोड झाल्याचे म्हटले गेले. त्याचे काही व्हीडिओदेखील समोर आले. तेव्हा झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली. त्यानंतर खासदार शाहू छत्रपती हे किल्ल्यावर गेले. तिथे हा संवाद झाला होता.

हे ही वाचा:

‘आसाममध्ये गंभीर प्रश्न, मुस्लिम लोकसंख्या १२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर’

शिवकालीन वाघनखे महाराष्ट्रात आली!

खेडकरांच्या बंगल्याबाहेरील अनधिकृत बांधकाम अखेर हटवलं !

मुंबई विमानतळावर ९ कोटी किमतीचे सोने जप्त, ७ जणांना अटक !

या गडावर गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. तेथे असलेल्या दर्ग्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून तोदेखील अनधिकृत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. आता स्थानिक प्रशासनाने कारवाई करत तेथील ९० अनधिकृत बांधकामे तोडली आहेत.

Exit mobile version