शाहबाज शरीफ झाले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

शाहबाज शरीफ झाले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून इम्रान खान यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर आता शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहेत.  शहबाज शरीफ यांची बिनविरोधी निवड करण्यात आली असून, आज रात्री ते पाकिस्तानची पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत.

पीएमएल-एनचे प्रमुख शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या नवीन पंतप्रधानपदी निवड झाली. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये झालेल्या मतदानादरम्यान शाहबाज ३४२ पैकी त्यांना १७४ मते मिळाली आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षाचे उमेदवार शाह मेहमूद कुरेशी यांना एकही मत मिळाले नाही. मतदानापूर्वी इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ म्हणजेच पीटीआयने सर्व खासदारांच्या राजीनाम्याची घोषणा करत सभागृहावर बहिष्कार टाकला. या दरम्यान, अयाज सादिक यांच्या अध्यक्षतेखाली नॅशनल असेंब्ली होती.

शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून आज रात्री ८ वाजता शपथ घेणार असून शाहबाज हे पाकिस्तानचे २३  वे पंतप्रधान असणार आहेत. तसेच शाहबाज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. हे नवीन पंतप्रधान पाकिस्तानातील पुढच्या निवडणुका होईपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर २०२३ पर्यंत पाकिस्तानचा कार्यभार सांभाळणार आहेत.

हे ही वाचा:

गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत २ दिवसांची वाढ

‘कायद्याच्या धाकाने नाही तर सर्वांशी प्रेमाने वागल्यानेच पोलिसांची प्रतिमा उंचावेल’

कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे ईडीच्या रडारवर

सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी पत्रकारांना आता चौकशीसाठी बोलावणार

पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आणि दुसऱ्या क्षणी इम्रान खान यांचे सरकार कोसळलं. सत्तास्थापनेच्या साडेतीन वर्षानंतर इम्रान सत्तेच्या खुर्चीवरून उतरले. यात १७४ सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूनं म्हणजेच इम्रान खान सरकारविरोधात मतदान केले आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाविरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे.

Exit mobile version