बहुमतानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

सत्तास्थापनेसाठी पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्यात युती

बहुमतानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

भारताचा शेजारी देश पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. मात्र, कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे एकाही पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नव्हते. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा चालू होती. दरम्यान त्यांनी युतीची घोषणाही केली होती. आता आघाडीवर एकमत झाल्यानंतर पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची दुसऱ्यांदा घोषणा करण्यात आली आहे.

शाहबाज शरीफ यांना ३३६ सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात बहुमत मिळाले. दोन्ही पक्षांचे एकूण २०१ सदस्य आहेत. त्यामुळे शाहबाज शरीफ यांची एकमताने पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. आव्हान देणारे ओमर आयुब खान यांना केवळ ९२ सदस्यांचा पाठिंबा मिळू शकला. ओमर आयुब हे कारावासात असलेल्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे नेते आहेत.

हे ही वाचा:

तिकीट कापल्यावर भाजपाचे बिधुरी म्हणाले, ‘पाहुण्यां’चा आदर केला पाहिजे!

भारतीय नौदलाचा खलाशी बेपत्ता, शोध मोहीम सुरु!

दिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!

तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत

पंतप्रधान पदाची धुरा हातात येणार असल्याचे समजताच शाहबाज शरीफ म्हणाले, “माझे बंधू (नवाज शरीफ) तीन वेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते. त्या काळात झालेला पाकिस्तानचा विकास सर्वांनाच माहीत आहे. नवाब शरीफ यांनी विकसित पाकिस्तानचा पाया रचला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.” शाहबाज शरीफ सोमवारी राष्ट्रपतींचे निवास्थान ऐवान-ए-सदर येथे पंतप्रधानपदाची शपथ घेतील. शाहबाज शरीफ हे यापूर्वी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान आघाडीच्या सरकारमध्ये पंतप्रधानपदी होते.

Exit mobile version