“उद्धव ठाकरे आणि ४० आमदार यांच्यात दरी पडायला दोन राऊत जबाबदार”

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला गौप्यस्फोट

“उद्धव ठाकरे आणि ४० आमदार यांच्यात दरी पडायला दोन राऊत जबाबदार”

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि ४० आमदार यांच्यात दरी कोणामुळे पडली याबाबत गौप्यस्फोट केला आहे. आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे, असा सणसणीत टोला शहाजीबापू पाटील यांनी लगावला आहे. त्याचबरोबर, या दोघांसोबतच अजूनही दोघं-तिघं यासाठी कारणीभूत आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे.

आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. संजय राऊत आणि विनायक राऊत हेच जबाबदार असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

“अंधेरी पोटनिवडणुकीची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोडली आहे. या जागेवर युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी गेले तीन महिने काम केलेले असून त्यांना मागील निवडणुकीतही चांगली मतं पडली होती. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यात आली, असे स्पष्टीकरण शहाजीबापू पाटील यांनी दिले आहे.

हे ही वाचा

रशियन सैन्य तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ११ सैनिकांचा मृत्यू

रुद्रांक्ष पाटीलचा ‘ऑलिम्पिक वेध’

नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकताना उपस्थितांना भरून आले

‘एकता कपूर बिघडवत आहे तरुणाईला!’

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. तेव्हापासून राजकारणात वेगवेगळ्या प्रकारची गणित चालू झाली आहेत, आगामी काळात अजूनही वेगवेगळी गणितं आणि आराखडे बघायला मिळतील,” असंही शहाजीबापूंनी सांगितलं आहे.

Exit mobile version