काय झाडी, काय डोंगार, काय ते हाटील…एकदम ओक्के….या वाक्याने प्रकाशझोतात आलेले आमदार शहाजीबापू पाटील आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता शहाजीबापू पाटील यांनी एक नवीनच बॉम्ब गोळा टाकला आहे. त्यांच्या या नव्या विधानाची चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे.राष्ट्रवादी फुटण्याच्या मार्गावर आहे. राष्ट्रवादीचे बारा आमदार आमच्या संपर्कात आहेत, यामध्ये सोलापूर जिल्यातील एका मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. सगळं ठरलं आहे फक्त मुहूर्त ठरायचा बाकी आहे असे खळबळजनक विधान आमदार पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीमधील अधिवेशन संपल्यानंतर जयंत पाटील,अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे भाकीत केले. पडण्याची गणितेही मंडळी आहेत. त्याला शहाजीबापू पाटील यांनी आपल्या शैलीत उत्तर देताना पुढचे १५ वर्ष तरी शिंदे आणि फडणवीस हेच महाराष्ट्रावर राज्य करतील, असं म्हटलं आहे. पुढची १५ वर्षे येथे दुसरे कुणी येणार नाही. फडणवीस आणि शिंदेच आषाढी-कार्तिकीला येतील असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
ठाकरेंना सोडवेना अनैसर्गिक नात्याचा मोह…
वेंगसरकर अकादमीची पकड; हर्ष आघावचा बळींचा षटकार, रोहन नाबाद ८३
मालवणीतल्या बांगलादेशी व रोहिंग्यांवर लक्ष ठेवा!
चोरांनी साजरा केला शाहरुख खानचा वाढदिवस
शहाजी पाटील म्हणाले की, सरकार पाडण्याची भाकिते यापूर्वीही झाली आहेत. मी १९९५ मध्ये काँग्रेसचा आमदार होतो. त्यावेळी शरद पवार आम्हाला ५ वर्षे सांगत होते की पुढच्या महिन्यात सरकार पडेल. पण मनोहर जोशी आणि नारायण राणे यांचे सरकार पडले नाही . आम्हाला निवडणुकीला सामोरे जावे लागले . ते म्हणाले की, आताही त्यांच्या पक्षाचे नेते सरकार पडण्याची वक्तव्ये करत आहेत.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आमच्या पक्षाबाबत काही अफवा पसरवल्या जातात. तसं काही नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत.