२६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्याच्या परिसरात धिंगाणा घालणाऱ्या खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी आता १५ ऑगस्ट या भारताच्या स्वातंत्र्य दिनाला लक्ष्य करण्याचे ठरवले आहे. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे ध्वजवंदन रोखा आणि ते करणाऱ्याला १० लाख डॉलर बक्षीस स्वरूपात देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले आहे. सिख फॉर जस्टिस या खलिस्तानवादी संघटनेकडून ही घोषणा करण्यात आली आहे.
भारतात बंदी असलेल्या सिख फॉर जस्टिस या खलिस्तानी फुटीरतावादी संघटनेकडून भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यासाठी संघटनेतर्फे एका ध्वनीफिती मार्फत आवाहन करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ध्वजारोहण करण्यापासून जो थांबवेल त्याला १ मिलियन युएस डॉलर अर्थात १० लाख डॉलर इतकी रक्कम रोख स्वरूपात देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले. सिख फॉर जस्टिस संघटनेचा सरचिटणीस गुरुपतवंत सिंह पन्नून याने ही घोषणा केली आहे.
हे ही वाचा:
ऑगस्ट क्रांतिदिनी काँग्रेस नेत्याच्या फेसबुकवर ‘कांती’च्या मशाली
शिवसेना राष्ट्रवादीच्या खुंटीला बांधल्याचे चित्र
चारशे कोटींचे खाशाबांचे स्टेडियम महाराष्ट्रात का नाही?
श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट; लव्ह जिहादचे जाळे टाकून अल्पवयीन मुलीला पळवले
भारत सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी पंतप्रधानांना थांबवण्यात यावे असे आवाहन या ध्वनिफितीतून करण्यात आले आहे. तर आम्ही लवकरच पंजाब भारतापासून हिसकावून घेऊ आणि असे झाल्यावर आम्ही लाल किल्ल्यावर खलिस्तानी झेंडा फडकावू असे प्रक्षोभक विधान या ध्वनिफितीत केले गेले आहे. ‘ऑप इंडिया’ या इंग्रजी न्यूज पोर्टलने या संदर्भातील वृत्त दिले आहे.