27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणठाकरे सरकारचा आता नालेसफाई घोटाळा?

ठाकरे सरकारचा आता नालेसफाई घोटाळा?

Google News Follow

Related

निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेवर नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे वाझे आणि नालेसफाईच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी आज मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ही मागणी केली. सचिन वाझेला पालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगण्यात आले होते. तशी माहिती कोर्टाच्या रेकॉर्डवर आली आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाची आणि वाझेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी पूर्णपणे झालेली नाही. नालेसफाईचे काम १००% पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा खोटा आहे. नालेसफाई करून दाखवण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला या जबाबदारीतून हात झटकता येणार नाही. ७० कोटी रुपये नालेसफाईसाठी खर्च केलेल्या महापालिकेला त्याचा हिशोब द्यावा लागेल, असं सांगतानाच शिवसेनेनं नाल्यावर शेती करण्याची नवीन योजना सुरू केल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

भाजपामध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता नाही

आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार?

सिद्धूना उपमुख्यमंत्रीपदही नाही आणि प्रदेशाध्यक्षपदही नाही

पहाटेच्या शपथविधीनंतर घरी घेतलं नसतं तर काय लायकी राहिली असती?

दरम्यान यापूर्वी शेलार यांनी नालेसफाईवरून पालिकेवर टीका केली होती. ७० कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही आश्वासन दिलं त्याचा आहे, मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. ५ लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे?, असा सवाल त्यांनी केला होता. ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा, असं आव्हान देतानाच नालेसफाईत सुद्धा कट कमिशन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा