राहुल गांधींच्या भाषणाचे अनेक भाग लोकसभा रेकॉर्डमधून हटवले

हटवलेल्या भागांमध्ये हिंदू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-भाजप-आरएसएस, इतरांबद्दल केलेल्या टिप्पण्यांचा समावेश

राहुल गांधींच्या भाषणाचे अनेक भाग लोकसभा रेकॉर्डमधून हटवले

संसदेचे लोकसभा अधिवेशन सध्या सुरू असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवार, १ जुलै रोजी लोकसभेत भाषण केले यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदू मणिपूर, नीट परीक्षा, शेतकरी, अग्निवीर आणि आरएसएस यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मंत्र्यांनी उभे राहून राहुल गांधींच्या भाषणावर आक्षेप घेतला. दरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत दिलेल्या भाषणातील अनेक भाग काढून टाकण्यात आले आहेत.

भगवान शिव, गुरु नानक आणि येशू ख्रिस्त यांची चित्रे धरून त्यांनी निर्भयतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हिंदू, इस्लाम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध आणि जैन धर्माचा राहुल यांनी लोकसभेतील आपल्या भाषणात संदर्भ दिला. यावेळी राहुल यांनी कुराण निर्भयतेबद्दल बोलते हे अधोरेखित करण्यासाठी गांधींनी प्रेषित मुहम्मद यांचा उल्लेख केला. राहुल गांधींच्या या वक्तव्यांमुळे सभागृहात गदारोळ माजला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी राहुल यांचे भाषण रेकॉर्डवरून हटवण्याची मागणी केली होते. संसदेच्या कामकाजातून काढून टाकलेल्या विधानांमध्ये भाजपावर केलेले आरोप, भाजपा अल्पसंख्याकांना अन्यायकारक वागणूक देत आहे, उद्योगपती अदानी आणि अंबानी यांच्यावर केलेली टिप्पणी, NEET परीक्षा श्रीमंतांसाठी आहे आणि त्यात गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणतेही स्थान नाही, अग्निवीर योजना ही भारतीय लष्कराची नाही, तर पंतप्रधान कार्यालयाची आहे याचा समावेश आहे. तसेचग हटवलेल्या भागांमध्ये हिंदू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी-भाजप-आरएसएस, इतरांबद्दल केलेल्या टिप्पण्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल

बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!

राहुल गांधींच्या आरोपांनंतर नरेंद्र मोदी संतापले, लोकसभेत गोंधळ

४२० कलमाचा अंत आता फसवणुकीसाठी कलम ३१८ !

राहुल गांधी यांच्या भाषणावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी हिंदू वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. हिंदू समाजाला हिंसक म्हणणे चुकीचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. हे वक्तव्य कोट्यवधी हिंदूचा अपमान करणार असल्याचे मत अमित शाह यांनी व्यक्त केले. हिंसेला एखाद्या धर्माशी जोडणे हे चुकीचे असल्याचे अमित शाह यांनी स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.

Exit mobile version