पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

बंगाल मध्ये आज सातव्या टप्प्यातील मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून बंगालमधील जास्तीत जास्त नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याबरोबरच त्यांनी कोविड संबंधित सर्व निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे.

हे ही वाचा:

अमेरिका पाठवणार कोविड लसीचा कच्चा माल

पंडित राजन मिश्र यांचे निधन

माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन

आणखी दोन पत्रकारांचे निधन

ट्विट मध्ये मोदींनी म्हटले आहे की,

बंगालमधील जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी मतदान करावे आणि कोविडच्या सर्व निर्बंधांचे पालन करावे अशी मी विनंती करतो.

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमधील आज मतदानाचा सातवा टप्पा सुरू झाला आहे. पश्चिम बंगाल सोबतच आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांच्या निवडणुका देखील पार पडल्या होत्या. बंगाल व्यतिरिक्त सर्व राज्यांमधील निवडणुका या एकाच टप्प्यात पार पडल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये मतदान आठ टप्प्यांमध्ये होत आहे. सर्व राज्यांमधील निवडणुकांचे निकाल दोन मे रोजी लागणार आहेत. यासोबतच महाराष्ट्रामधील पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील पोटनिवडणूक सुद्धा झाली होती. या निवडणुकीचा निकाल देखील दोन मे रोजी लागणार आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालमधील भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील लढतीकडे लागले आहे. देशात कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधानांनी कोविडच्या निर्बंधांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version