१७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी ७१ वा वाढदिवस साजरा करतायत. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे ७ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी प्रशासनात २० वर्षे पूर्ण करतायत. याच पार्श्वभूमीवर मोदींचा राजकीय प्रवास आणि त्यांचं यश साजरं करण्यासाठी भाजपाकडून तीन आठवड्यांचं एक मोठं अभियान हाती घेतलंय. हे अभियान देशभर राबवलं जाणार असून भाजपला आणखी मजबूत करण्यासाठी बूथ लेवलपर्यंत प्रयत्न केले जाणार आहेत.
अभियानांतर्गत भाजपाकडून १४ कोटी रेशन बॅग वाटण्यात येणार आहेत. तसच देशभरातल्या बूथवरून थँक्यू मोदी जी लिहिलेले ५ कोटी पोस्टकार्ड पाठवले जाणार आहेत. ७१ जागी नद्यांची साफसफाईचा कार्यक्रम आखला जाणार आहे. तसेच सोशल मीडिया कँपेन, वॅक्सिनेशन व्हिडीओ, मोदींचं आयुष्य आणि काम यावर ठिकठिकाणी सेमीनार भरवले जाणार आहेत. हे सगळं मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा भाग असेल. तीन आठवड्यापर्यंत कार्यक्रम चालणार आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षानं आदेश दिलाय की, गांधी जयंती म्हणजे २ ऑक्टोबर ते दीनदयाल उपाध्याय जयंती म्हणजेच २५ सप्टेंबर दरम्यान कार्यकर्त्यांनी कुठलं ना कुठलं सामाजिक कार्य करावं. गेल्या वर्षी पक्षानं ‘सेवा सप्ताह’ चालवला होता. यावेळेस ‘सेवा आणि समर्पण’ अभियान असं नाव दिलं गेलंय. मोदी आणि त्यांच्या सरकारनं विविध क्षेत्रात जे यश मिळवलय ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाईल.
हे ही वाचा:
हत्यारांची पूजा करून ‘कुलपं’ तोडणारी टोळी जेरबंद
शेतकरी आंदोलनामुळे किती नुकसान झाले?
स्पुटनिकच्या तिसऱ्या चाचणीला मंजुरी
जावेद अख्तर, तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही!
मोदी सरकारनं मोफत वॅक्सिनेशन केलं. तेही हायलाईट केलं जाणार आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो असलेल्या १४ कोटी राशन बॅग वाटण्यात येतील. यात पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत ५ किलो रेशन ह्या बॅगेत असेल. विशेष म्हणजे भाजपशासित राज्यात आतापर्यंत २.१६ कोटी बॅग वाटण्यात आल्यात. कोरोना महामारीच्या काळात मोदींची मदत झाली, त्यामुळे त्यांना धन्यवाद देणारे व्हिडीओ दाखवले जाणार. यात गरीबांचे मसिहा मोदीजी असा संदेश असणार आहे. तसेच हा ७१ वा वाढदिवस आहे, त्यामुळे ७१ ठिकाणी नद्यांची साफसफाई अभियान राबवलं जाईल. राज्य आणि जिल्हा स्तरावर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. कोरोनाकाळात जी मुलं अनाथ झालीत, त्यांना पीएम केअर फंडातून मदत देण्यासाठी नोंदणी अभियान चालवलं जाईल. यासोबत पंतप्रधान मोदींना अनेक सन्मानचिन्हं आणि प्रतिमा मिळालेल्या आहेत याबद्दलही माहिती देण्यात येईल.