रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारताचे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी कौतुक केले आहे. ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी ते बोलत असताना त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे. राशियासोबत व्यापार करणाऱ्या भारतावर जगभरातून दबाव आहे. मात्र, तरीही भारत आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि त्यानुसार भारत आपले परराष्ट्र धोरण बनवत आहे. ही मोठी गोष्ट आहे, असे सर्गेई लावरोव म्हणाले.
पुढे त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचेही कौतुक केले. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता स्वत:चे परराष्ट्र धोरण ठरवले. हे कौतुकास्पद असून एस जयशंकर हे भारताचे खरे देशभक्त आहेत, असे सर्गेई लावरोव म्हणाले.
भारताचा विकास आणि सुरक्षितता यावर विश्वास ठेवून देशासाठी निर्णय घेण्यात येत आहेत, असे स्पष्ट बोलण्याचे धाडस फारच कमी देशांमध्ये आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियावर लादलेल्या अनैतिक निर्बंधांची पर्वा न करणाऱ्या सर्व देशांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत. भारत हा त्यापैकी एक आहे, असेही सर्गेई लावरोव म्हणाले.
हे ही वाचा:
मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना म्हणजे बकासूर!
मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारच!
इलैयाराजा यांच्या पुस्तकातून मोदी-डॉ. आंबेडकर तुलनेमुळे अनेकांना पोटदुखी
सुपरस्टार आर. माधवनच्या मुलाने असं काय करून दाखवलं?
रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणाऱ्या भारताने रशियाला वैद्यकीय उपकरणे देण्याचे मान्य केले आहे. पाश्चात्त्य देशांनी रशियावर अनेक आर्थिक आणि व्यापारी निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियामध्ये वैद्यकीय उपकरणांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत रशिया पुन्हा एकदा भारताकडे मदतीच्या आशेने पाहत आहे. भारतही रशियाला मदत करण्यास तयार आहे. स्थानिक चलनात हा व्यापार केला जाईल अशी चर्चा आहे.