हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित दोन संघटनांनी फुटिरतावादाचा त्याग करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घडवलेल्या नव्या भारतावर विश्वास व्यक्त केला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात फुटिरतावाद संपत चालला आहे आणि संपूर्ण काश्मीरमध्ये एकतेचा विजय घुमत आहे, असाच याचा अर्थ आहे, असे उद्गार गृहमंत्री अमित शहा यांनी काढले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिले, “काश्मीर खोऱ्यातून आणखी एक मोठी आनंदाची बातमी! हुर्रियतशी संबंधित दोन गट – जम्मू-काश्मीर तहरीक-ए-इस्तिकलाल आणि जम्मू-काश्मीर तहरीक-ए-इस्तिकामत यांनी फुटिरतावादाचा त्याग केला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घडवलेल्या नव्या भारतावर विश्वास दाखवला आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली फुटिरतावाद अखेरच्या घटका मोजत आहे आणि त्यामुळे संपूर्ण काश्मीरमध्ये एकतेच्या विजयाचा आवाज गुंजत आहे.”
यापूर्वी, मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली होती की, हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित जम्मू आणि काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (JKPM) आणि डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंट या दोन गटांनी फुटिरतावादाशी असलेले सर्व संबंध तोडल्याचे जाहीर केले आहे.
यासंदर्भात, गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’ वर लिहिले होते, “काश्मीरमध्ये फुटिरतावाद आता इतिहासजमा झाला आहे. मोदी सरकारच्या एकात्मिक धोरणांमुळे जम्मू-काश्मीरमधून फुटिरतावाद संपुष्टात आला आहे. हुर्रियतशी संबंधित दोन संघटनांनी फुटिरतावादाशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत. मी भारताच्या एकतेसाठी या महत्त्वपूर्ण पावलाचे स्वागत करतो आणि अशा सर्व गटांना आवाहन करतो की, त्यांनी पुढे येऊन फुटिरतावाद कायमचा संपवावा. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रगत, शांततापूर्ण आणि एकात्मिक भारताच्या दृष्टिकोनाची मोठा विजय आहे.”
हे ही वाचा:
दिशा सालियन हत्येमागे सेलिब्रेटींचे ड्रग्ज रॅकेट
पाकिस्तानातील क्वेटामध्ये आयईडी स्फोटात तीन ठार
हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित आणखी दोन गटांनी फुटीरतावादाचा केला त्याग
बलुचिस्तानमधील संघर्ष, परराष्ट्र धोरणावरून इम्रान खान यांनी पाक सरकारला सुनावले
यापूर्वी, संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले होते की, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमधील तरुणांचा दहशतवादाकडे असलेला कल जवळपास संपुष्टात आला आहे. १० वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे उदात्तीकरण केले जात असे, त्यांच्या अंत्ययात्रा मोठ्या स्तरावर आयोजन केले जात असे. मात्र, आमच्या कार्यकाळात दहशतवादी मोठ्या प्रमाणात ठार झाले, तरी कुठल्याही अंत्ययात्रा काढण्यात आल्या नाहीत. जो दहशतवादी जिथे मारला जातो, तिथेच त्याला पुरले जाते.