शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय, विश्वासू सहकारी अशी सुधीर जोशी यांची ओळख होती.

सुधीर जोशी सुरुवातीपासूनच बाळासाहेबांचे खंदे समर्थक आणि एक कट्टर शिवसैनिक ओळखले जातात. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये त्यांची गणना होते. शिवसेना या पक्षाचा जन्म झाला तेव्हा सुरुवातीच्या काळात जे बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यापैकी एक सुधीर जोशी हे होते. त्यांनी पक्षसंघटनेत अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहेत.

हे ही वाचा:

अवघ्या सोळाव्या वर्षी गुजरातच्या बॅडमिंटनपटू तस्मिनने रचला इतिहास

३ हजार कोटींच्या शिक्षण अर्थसंकल्पात मराठी शाळांसाठी ‘शून्य’

संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला

नवाब मलिक लावणार चांदीवाल आयोगासमोर हजेरी

या सोबतच निवडणुकीच्या राजकारणाचाही त्यांना दांडगा अनुभव आहे. ते मुंबई महापालिकेत दुसरे महापौर राहिले आहेत. तर ९५ ते ९९ या काळात जेव्हा शिवसेना-भाजपा युतीचे सरकार महाराष्ट्रात होते तेव्हा त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदी काम केले आहे. ते महाराष्ट्र सरकारमध्ये महसूल मंत्री होते.

शिवसेनेचा एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा अशी त्यांची ओळख होती. बाळासाहेबांनी त्यांच्या खांद्यावर स्थानीय लोकाधिकार समितीची जबाबदारी सोपवली होती जी जोशी यांनी अतिशय समर्थपणे सांभाळली. गेल्या काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालावली होती. त्यांना कोरोनाने ग्रासले होते. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातून बरे होऊन ते घरी देखील परतले होते. पण त्यांची प्रकृती पुन्हा एकदा अस्थिर झाली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Exit mobile version