राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांना अध्यक्षांबाबत वापरलेले अपशब्द महागात पडले आहेत. नागपूर अधिवेशनापर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे.
दिशा सालियन मृत्यू संदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये खडाजंगी झाली. त्यावेळी जयंत पाटील यांनी अध्यक्षांबाबत अपशब्द वापरले होते. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने जयंत पाटील याना निलंबित करावे अशी मागणी केली होती.
नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस हा दिशा सालियन मृत्यू प्रकरणाने गाजला. सत्ताधारी पक्षाने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत आदित्य ठाकरे याना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपाचे आमदार भरत गोगावले आणि नितीश राणे यांनी दिशा सालियनचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी. कशामुळे सुशांतसिंगची हत्या करण्यात आली. रिया चक्रवर्तीची या प्रकरणात भूमिका काय आहे? या प्रकणात तपास अधिकारी दोनदा का बदलले गेले? या सर्व गोष्टींची चौकशी होणं गरजेचं असल्याचे राणे म्हणाले.
सत्ताधाऱ्यांच्या मागणीनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असं सभागृहात सांगितलं. त्यावेळी विरोधकांना बोलू दिलं जात नाही, असं म्हणत विरोधीपक्षातील आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. दिशा सालियन प्रकरणावर विरोधकांना बोलू दिल जात नाही असे म्हणत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना परवानगी नाकारली.
हे ही वाचा:
…म्हणून गुजरातमध्ये सर्वाधिक ड्रग्ज सापडले
ठाकरे गटाला धक्का, संजय राऊतांचे जामिनदारच शिंदे गटात
मुंबई मेट्रो लाइन ३ ची गाडी तय्यार!
अजित पवार यांनाही बोलू दिले नाही. यावेळी जयंत पाटील यांनी अध्यक्ष महोदय तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला. अयान पाटील यांच्या वक्तव्याला सत्ताधाऱ्यांनी जोरदार हरकत घेत जयंत पाटील यांच्या निलंबनाची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द वापरून सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली. सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला. त्यांच्या अशा वक्तव्याकडे दुर्लक्ष केल्यास चुकीचा पायंडा निर्माण होईल. सदस्यत्व रद्द करण्याचे ठराव आला आहे.
अजित पवार यांनी व्यक्त केली दिलगिरी
अनेक वर्षे सभागृहात काम करतो, असे वक्तव्य अजाणतेपणाने जाऊ नये अशा विचारांचे आम्ही आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न केला. सदस्यांच्या भावन तीव्र आहेत. असा शब्दप्रयोग झाला त्याबद्दल मी स्वत: दिलगिरी व्यक्त करतो. अध्यक्षांबद्दल आदराची भावना आहे, यापुढेही हीच भावना ठेवू” असे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी यावेळी सांगितले.