‘काँग्रेस आणि सपाला पाच वर्षांच्या रजेवर पाठवा, म्हणजे ते माफियांच्या कबरीवर फातिहा वाचू शकतील’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मतदारांना आवाहन

‘काँग्रेस आणि सपाला पाच वर्षांच्या रजेवर पाठवा, म्हणजे ते माफियांच्या कबरीवर फातिहा वाचू शकतील’

फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजकुमार चहर यांचा प्रचार करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील ब्रजभूमीचे महत्त्व अयोध्या आणि काशीइतकेच मौल्यवान आहे, यावर प्रकाश टाकला. ज्याप्रमाणे या ठिकाणांनी त्यांच्या आकांक्षा पूर्ण केल्या आहेत, त्याचप्रमाणे आता ब्रजभूमी चमकण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. चहर हे भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या विरोधात बसपचे राम निवास शर्मा आणि काँग्रेसचे उमेदवार राम नाथ सिकरवार उभे आहेत. फतेहपूर सिक्री जागेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.

‘विरोधी पक्षांना कळवून टाका की ते कमळाच्या चिन्हाला मतदान करतील आणि त्यांना पाच वर्षांचा ब्रेक देतील. म्हणजे ती पाच वर्षे ते गुन्हेगारांच्या कबरीवर फातिहा वाचू शकतील,’ असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी नुकतेच निधन झालेला गुंड-राजकारणी मुख्तार अन्सारी याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला होता. या घटनेचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि विरोधी पक्ष यांच्यातील विरोधाभासी प्राधान्यक्रम निदर्शनास आणून दिला. ‘भाजप राष्ट्रीय हितांवर लक्ष केंद्रित करतो, तर विरोधी पक्ष अनेकदा जात, समुदाय आणि घराणेशाहीच्या विचारांवर भर देतात,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.

संकुचित जाती, सांप्रदायिक किंवा कौटुंबिक हितसंबंधांना संपूर्ण राष्ट्राच्या हितापेक्षा प्राधान्य देणाऱ्या विरोधकांच्या फुटीरतावादी डावपेचांपासून त्यांनी सावध केले. याउलट, भाजपचे आचारविचार ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वाला अनुसरून आहेत. कल्याणकारी योजना प्रत्येक नागरिकापर्यंत जात किंवा जातीय संबंधांचा विचार न करता पोहोचतात. ध्रुवीकरणाचा अवलंब न करता सर्वांना सुरक्षा आणि विकास प्रदान करणे ही भाजपची वचनबद्धता असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

हे ही वाचा:

हाँगकाँग, सिंगापूरमध्ये बंदीनंतर एमडीएच, एव्हरेस्टच्या मसाल्यांची तपासणी होणार

तैवानला पुन्हा भूकंपाचे धक्के; १७ जण जखमी

…तर साहेबांनी अजितदादांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी तरी दिली असती का?

‘पुतना‘ मावशीचं सोंग घेणाऱ्या शरद पवारांना मोदीजींमध्ये ‘पुतीन‘ दिसायला लागलेत!

पाकिस्तानचे भौगोलिक क्षेत्र मोठे असूनही, पाकिस्तानमधील लाखो लोक सध्या अन्न असुरक्षिततेने ग्रस्त आहेत, तर, भारत ८० कोटी नागरिकांना मोफत रेशन पुरवतो हे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानशी तुलना केली. गरीबी निर्मूलनात केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर त्यांनी प्रकाश टाकला. गेल्या दशकात किमान २२ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सपा, बसपा आणि काँग्रेसच्या नेत्यांवर गरीब आणि शेतकऱ्यांसाठी असलेला निधी वळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक कल्याणकारी उपाययोजना सुरू केल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version