राष्ट्रवादी, शिवसेनेला कापरं भरलं म्हणून त्यांनी पाळत ठेवली असावी

राष्ट्रवादी, शिवसेनेला कापरं भरलं म्हणून त्यांनी पाळत ठेवली असावी

नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना कापरं भरलं आहे. म्हणूनच त्यांनी पाळत ठेवली असावी असं नाना पटोले यांच्या वक्तव्यातून आम्हाला वाटतं. मात्र नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच त्यांच्यावर पाळत ठेवायची गरज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना का भासत आहे याचा उत्तर तेच देऊ शकतात, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोणावळ्यातल्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत, असा आरोप केला आहे. आयबीच्या मदतीनं आपल्या हालचालींवर नजर ठेवली जात आहे, असा खळबळजनक दावा पटोलेंनी केला आहे. पटोलेंच्या या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपाच्या अनेक नेत्यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनीही पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याचा नाना पटोलेंचा आरोप गंभीर आहे. याची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी माझी मागणी आहे.” असं ट्विट भातखळकरांनी केलं आहे.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीचे मन में है अविश्वास, पुरा है अविश्वास!

‘या’ नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्या

एलआयसीचा आयपीओ डिसेंबर महिन्यापर्यंत?

कोरोना पाठोपाठ देशात झिकाचा अलर्ट

“आपल्याच सहकाऱ्यावर अशा प्रकारची पाळत ठेवली जाते, असं स्वतः सरकारमधील एका पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बोलतोय, हे महाविकास आघाडी सरकार म्हणून अत्यंत गंभीर आहे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये आपापसातच सुसंवाद नसेल, समन्वय नसेल, तर राज्याच्या जनतेला आपण काय देणार आहोत? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सध्या राज्य एका वेगळ्या वळणावर आहे, असं मला वाटतंय.” असं प्रवीण दरेकर म्हणाले.

Exit mobile version