24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला

ऑलिम्पिकमध्ये तिरंगा घेऊन संपूर्ण देश रोमांचित झाला

Google News Follow

Related

“‘ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन चालताना बघून केवळ मीच नाही, तर संपूर्ण देश रोमांचित झाला होता. त्याक्षणी, संपूर्ण देशाने जणू एकत्र येत, आपल्या या योद्ध्यांना विजयी भव म्हटले आहे.” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन दिलं आहे. आपण सगळे मिळून आपल्या या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊया, त्यांचा उत्साह वाढवूया. सोशल मीडियावर देखील ऑलिंपिक खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आता कॅम्पेन सुरु झाले आहे, असंही मोदी यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, २५ जुलै रोजी, ‘कारगिल विजय दिवस’ही आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे असे प्रतीक आहे, जे संपूर्ण जगाने पहिले आहे. यावर्षी हा गौरवास्पद दिवस देखील अमृत महोत्सवाच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे, असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, सात ऑगस्ट रोजी येणारा ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ आपल्यासाठी अशी एक संधी आहे ज्यावेळी आपण प्रयत्नपूर्वक हे काम करु शकतो. राष्ट्रीय हातमाग दिनामागेही खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.याच दिवशी, १९०५ साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती, असं ते म्हणाले.

हे ही वाचा:

तालिबानविरुद्ध आता रशिया आणि ताजिकिस्तानही सज्ज

फडणवीस, राणे आणि दरेकरांचा आज कोकण दौरा

महाराष्ट्रातील जेईईच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

आपत्तीची दरड….

‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेऊन जाताना पाहून केवळ मलाच नाही तर संपूर्ण देशाला आनंद झाला होता. जसे संपूर्ण देश एकत्रित झाला आणि या योद्धांना म्हणाला की तुम्ही विजेते असू शकता. पंतप्रधान म्हणाले, मित्रांनो, यावेळी १५ ऑगस्ट रोजी देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी दाखल होत आहे. हे आपले मोठे भाग्य आहे की आपण स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचे साक्षीदार आहोत. ज्यासाठी देशाने शतकानुशतके प्रतीक्षा केली. १५ ऑगस्ट रोजी एक अनोखा प्रयत्न करणार आहोत. या दिवशी शक्य तेवढे भारतीय राष्ट्रगीत गाण्याचा संस्कृती मंत्रालयाचा प्रयत्न आहे. यासाठी राष्ट्रीय गान डॉट कॉम तयार करण्यात आले आहे. या वेबसाइटच्या मदतीने आपण राष्ट्रगीत रेकॉर्ड करता येईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा