राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे. शुक्रवार, ८ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आक्रोशानंतर हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. तर या सोबतच शरद पवार यांच्या कुटुंबियांनाही सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर अचानकपणे एसटी आंदोलक जमा झालेले पाहायला मिळाले. आक्रमक एसटी आंदोलक शरद पवार यांच्या घरावर चालून आल्यामुळे राज्यात एकाच खळबळ उडाली. पोलिसांनाही या संपूर्ण प्रकरणाची कोणतीच कल्पना नव्हती. यावेळी एसटी आंदोलक खूपच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी शरद पवार यांच्या घराच्या दिशेने दगड आणि चप्पलही भिरकावण्यात आले.
हे ही वाचा:
आझाद मैदानातून हटवल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा सीएसएमटी स्थानकात ठिय्या
‘एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला हल्ला म्हणजे पोलीस यंत्रणेचे अपयश’- अजित पवारांची प्रतिक्रिया
‘लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न’
मध्यरात्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विटर हँडल हॅक
या संपूर्ण परिस्थितीनंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असून आता शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. शरद पवार यांचा रविवार, १० एप्रिल रोजी नागपूर दौरा नियोजित आहे. शुक्रवारच्या घटनेनंतरही शरद पवार हे आपल्या नागपूर दौऱ्यावर ठाम आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येऊ शकते.
एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पवार यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळेच आता शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तर शरद पवार यांच्या कुटुंबालाही सुरक्षा पुरवण्यात येऊ शकते.