…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली

मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा आता एक्स वरून वाय दर्जावर

…. म्हणून मिलिंद नार्वेकरांची सुरक्षा वाढवली

शिंदे फडणवीस सरकारने महविकास आघाडीमधील बड्या नेत्यांची सुरक्षा कपात केली. मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. पण त्यांची सुरक्षा का वाढवण्यात आली, याचे कारण समोर आले आहे.

एबीपी माझाने याबद्दल वृत्त दिले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता मिलिंद नार्वेकरांना धोका असल्याचे राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेणाऱ्या समितीने म्हटले आहे. तसा अहवाल त्यांनी मुंबई पोलिसांना दिला आहे. त्यानुसार नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा एक्स सिक्युरिटीपासून वाय सिक्युरिटी प्लस आणि एक्सकॉर्ट करण्यात आली आहे.

अलीकडे मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार अशी चर्चा सुरू होती. गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेटही घेतली होती. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची मत मिळाली नव्हती. तसेच नार्वेकरांचे शिंदे गटाच्या तसेच भाजपाच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत.

हे ही वाचा:

कॉमेडियन भारती सिंगविरोधात ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल

मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ

बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट, सात पोलिसांसह ३० जखमी

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी

या सर्व घडामोडी पाहता नार्वेकरांना धोका असल्याची माहिती पोलिसांना आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आणि समितीने खबरदारी म्हणून नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या या माहितीला शिंदे गटाचे आमदार नरेश मस्के यांनी देखील दुजोरा दिला आहे.

Exit mobile version