आंदोलकांच्या भितीने अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ

आंदोलकांच्या भितीने अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ

महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापाचा उद्रेक आज पाहायला मिळाला. महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हातात आहे असे मानले जाते त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हे आंदोलक चालून गेले. तर पवारांच्या घरावर आंदोलक गेल्यामुळे राज्य सरकारने धसका घेतला असून शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

गेले पाच महिने विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापाचा कडेलोट आज पहायला मिळाला. आंदोलन करत असलेले हे एसटी कर्मचारी हे आज थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर चालून गेले. यावेळी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर आंदोलनाने हिंसक वळण घेत काही आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक सुद्धा केली.

हे ही वाचा:

शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक

आंध्रप्रदेशच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

UNHRC मधून रशिया निलंबित

इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार

अचानक घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. शरद पवार यांच्या घरावर चालून जाणाऱ्या आंदोलकांबाबत मुंबई पोलीस आणि गृह खात्याला कोणतीच माहिती नव्हती त्यामुळे त्यांची देखील तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. तरी यामुळे मुंबई पोलिसांचे अपयश पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत.

या सर्वच चिघळलेल्या परिस्थितीत खबरदारीची उपाययोजना करताना पोलिस दिसत आहेत. शरद पवार यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. हे आंदोलक आक्रमक होऊन अनिल परब यांच्या घरावरही चालून येऊ शकतात अशी भीती गृहखात्याला वाटत आहे. अनिल परब हे सध्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री म्हणून काम करत आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांच्याविरुद्ध राग आहे. त्यामुळे पोलीस सर्व खबरदारी बायकांना दिसत आहेत अनिल परब यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लावण्यात आले आहे. तर काही ठराविक व्यक्ती वगळता इतर कोणालाच प्रवेश दिला जात नाहीये.

Exit mobile version