मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?

मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?

उत्तर प्रदेशातील कृष्ण जन्मभूमी असलेल्या मथुरा येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मथुरा मधील कृष्ण जन्मभूमी आणि या ठिकाणी असलेली शाही इदगाह मस्जिद याचा वाद पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता स्थानिक पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मथुरा शहरात कलम १४४ लागू केले आहे.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी ढाचा पडल्यानंतर कायमच ‘काशी, मथुरा बाकी है’ या घोषणा कानावर पडत आल्या आहेत. तर रामजन्मभूमी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा पुन्हा जास्त चर्चेत येताना दिसत आहे. अशातच अखिल भारतीय हिंदू महासभा या हिंदुत्ववादी संघटनेने ६ डिसेंबर रोजी मथुरा येथील शाही इदगाह येथे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करून त्याला जलाभिषेक करण्याची घोषणा केली आहे. ६ डिसेंबर याच दिवशी बाबरी ढाचा पडला असल्यामुळे हीच तारीख निवडण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

दो साल, जनतेचे हाल

‘बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे एनसायक्लोपिडीयाच होते’

… म्हणून पंतप्रधान मोदींनी केले मराठमोळ्या तरुणाचे कौतुक

जॅकलिनचा ‘तो’ रोमँटिक फोटो ठरणार का ED साठी पुरावा?

पण हिंदू महासभेच्या या घोषणेनंतर मथुरा मधील धार्मिक तणाव वाढण्याची भीती प्रशासनाला वाटत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारीचे सर्व ते प्रयत्न केले जात आहेत. मथुराचे जिल्हाधिकारी नवनित सिंह च हल यांनी माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली की मथुरामध्ये २४ नोव्हेंबर ते २१ जानेवारी २०२२ या संपूर्ण कालावधीत जमाव बंदी लागू करण्यात आली असून संपूर्ण शहरात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्रित जमण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

मथुरेत कलम १४४ लागू केल्यानंतर पोलीस बंदोबस्तही जागोजागी वाढवण्यात आला आहे. तर येणाऱ्या-जाणाऱ्या सर्वांवर पोलिसांची करडी नजर आहे. कृष्ण जन्मभूमी आणि शाही इदगाह या परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. सध्या मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभुमीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असून जन्मभूमी परिसरातील १३.३७ एकर जमिनीवर मालकी हक्क सांगण्यात आला आहे. तर मंदिर स्थळावरून शाही इदगाह हटवण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version