सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदेंसोबत अनेक आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते आंदोलने, तोडफोड करत आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुंबई शहरात कलम १४४ लागू केला आहे. त्यामुळे जमाव किंवा गर्दी करता येणार नाही.
१० जुलैपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यामुळे मुंबई शहरात कोणत्याही प्रकारची गर्दी करता येणार नाही. एकनाथ शिंदे हे ४० हून अधिक आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये आहेत. अचानक इतके आमदार बंडखोर झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन अनेक ठिकाणी तोडफोड करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेविरोधात घोषणाबाजी आंदोलने केली जात आहेत. तर दुसरीकडे राज्यात एकनाथ शिंदे यांचे समर्थनही केले जात आहे. मुंबईमध्ये अनेक अशा घटना घडत आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या १० जुलै पर्यंत जमावबंदी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
… आणि २० देश जम्मू काश्मीरमध्ये एकत्र येणार
‘क्लीन चिट मिळाल्यामुळे मोदींचे नेतृत्व झळाळून निघाले’
फसलेला डाव आणि पवारांचा थयथयाट…
पाकने मृत घोषित केलेल्या २६/११ च्या हँडलरला घेतलं ताब्यात
शिवसैनिकांच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला असून सर्व पोलिस ठाण्यांना शहरातील सर्व राजकीय कार्यालयांमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. सुरक्षेसाठी अधिकारी स्तरावरील पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक राजकीय कार्यालयाला भेट द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. अचानक एवढे आमदार बंडखोर झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकार आणि स्वतःचा वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.