24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणअमित शाह- फडणवीस यांच्यात गुप्त बैठक

अमित शाह- फडणवीस यांच्यात गुप्त बैठक

Google News Follow

Related

महाराष्ट्रात सत्ताबदलाच्या चर्चांना वेग

महाराष्ट्राच्या राजकारणात गुप्त बैठकींचा सिलसिला सुरु असल्याचं दिसतंय. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरु असताना, आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही गुप्त बैठकीची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. फडणवीस आणि अमित शाह यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर या बैठकीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा फोनवरुन उपलब्ध होते. फडणवीस-मोदी आणि अमित शाह यांची २० मिनिटे चर्चा झाली.

महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात आले आणि त्यानंतर महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला मोजके आणि महत्त्वाचे भाजप नेते उपस्थित होते. त्यामुळे महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ने गती घेतलीय का असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याच्या घडामोडी सातत्याने समोर येत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर आता नवी माहिती समोर आली आहे. सरकार वाचवण्यासाठी संजय राऊत यांच्या हालचाली सुरु असल्याचं सुरु आहे. मंगळवारी गुप्त बैठक झाली. या बैठकीला संजय राऊत, उपमुख्यमंत्री अजित पवार, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते.

हे ही वाचा:

बला टळणार नाही…मी कुठेही जात नाहीये

पाच लाख लशींच्या कुप्या गायब झाल्या तरी कुठे?

आता बस झाले! दुकानांची वेळ वाढवा!!

दहा हजार गुंड आणण्याचे आदेश मातोश्रीवरून?

एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या गुप्त बैठकीचं वृत्त समोर आल्यानंतर, तिकडे स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “सरकार वाचवायचा प्रश्नच नाही आम्ही तिघेही सोबत आहोत. सरकार पाच वर्ष चालेल”, असं नाना पटोले यांनी ठणकावून सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा