राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने दुसरे समन्स बजावले आहे. या समन्सद्वारे २२ मे रोजी चौकशीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी ११ मे रोजी जयंत पाटलांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. मात्र, यावर जयंत पाटलांनी हजर राहण्याचा वेळ वाढवून घेतला होता. जयंत पाटील यांना ईडीने राज्याच्या सत्ता संघर्षाच्या निकालादिवशीच नोटीस पाठवली होती. त्यानुसार जयंत पाटील यांना सोमवार, १५ मे रोजी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, जयंत पाटील यांनी वेळ मागून घेतला होता. आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस बजावण्यात आली आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून अनेकांनी आर्थिक मोठा गैरव्यवहार केल्याचा असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी जयंत पाटील यांनाही समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणात सर्वप्रथम दिल्लीतील आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती पाहता हे प्रकरण ईडीकडे सोपवण्यात आले होते. हे ही वाचा : तमिळनाडूमध्ये विषारी दारूने १० जणांचा मृत्यू ‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा अपघात कर्नाटकात उपमुख्यमंत्री आणि पाच मंत्रीपदे मुस्लिमांना द्या आता ९२८ संरक्षण उत्पादनांची निर्मिती होणार भारतात प्रकरण काय आहे? आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू होती. या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली होती. मात्र, कंपनीच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप होता. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. त्यानंतर अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे.