सध्या राज्यात भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत आहे. पोलखोल अभियानासाठी भाजपा मुंबईत अनेक सभा घेत आहे. यापूर्वीच १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बूस्टर सभा घेतली होती. आता पुन्हा मुंबईतीत फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. १५ मे रोजी भाजपाने मुंबईत दुसऱ्या सभेची योजना केली आहे.
१५ मे रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानात भाजपाची सभा होणार आहे. याआधी १ मे रोजी घेतलेल्या सभेत फडणवीसांनी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले होते. हिंदुत्व, बाबरी मशिद आणि भोंग्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. या सभेत भाजपा नेते आणि कार्यकर्ते सोमय्या मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, १४ मे रोजी शिवसेनेकडून मुंबईत सभा होणार आहे. त्यांनतर लगेच दुसऱ्या दिवशी १५ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष फडणवीस यांच्या सभेकडे लागले असून, यावेळी ते काय बोलणार याची सर्वजण वाट पाहत आहेत. या महिन्यातील भाजपाची ही दुसरी मोठी सभा असणार आहे. उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्याकडून या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
‘न्यायालयाने केला ठाकरे सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणांचा पर्दाफाश केला’
नवी मुंबईत एमआयडीसीत भीषण आग, ९ कंपन्या जळून खाक
… म्हणून कोल्हापूर शहर १०० सेकंद झाले स्तब्ध
आठ दिवसांतून एकदा पाणी; औरंगाबादमध्ये भाजपा-मनसेचे आंदोलन
एमएमआरमधील उत्तर भारतीय मोर्चाचे कार्यकर्ते या १५ मेच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांची हिंदुत्ववादी भूमिका आणि उत्तर भारतीय मुद्द्यावर फडणवीस भाष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.