शनिवार, २३ एप्रिल रोजी संध्यकाळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना पोलिसांनी अटक केली होती. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी राणा दाम्पत्यांवर खार पोलीस स्टेशनमध्ये आता पुन्हा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कलम ३५३ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालची रात्र राणा दाम्पत्यांना पोलीस कोठडीत काढावी लागली. त्यानंतर रविवारी, २४ एप्रिल रोजी राणा दाम्पत्यांना मुंबईतील वांद्रे न्यायालयात हजर केले जाणार आहे. शनिवारी कलम १५३ अ च्या अंतर्गत राणा दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातून अटक केले होते. १५३ अ नुसार, दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. हे कलम अजामीनपात्र असून पोलीस त्यांना जामीन देऊ शकत नाहीत. त्यामुळे कालची रात्र राणा दाम्पत्यांना पोलीस ठाण्यात काढावी लागली.
हे ही वाचा:
मुंबई पोलीस आयुक्त उद्धव ठाकरेंचे चपरासी आहेत का?
राणा दांपत्याला भेटून येताना किरीट सोमय्यांवर हल्ला; गाडीची काच फुटून जखमी
‘मुंबईच्या डोक्यावरून भ्रष्टाचाराची सत्ता आम्ही उतरवणार’
राणा दाम्पत्यांवर दुसरा गुन्हा कलम ३५३ अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा राणा दाम्पत्यांवर दाखल केला आहे. न्यायालयात वकील प्रदीप घरत हे सरकारची बाजू मांडणार आहेत. तर राणा दाम्पत्यांची वकील रिझवान मर्चट बाजू मांडणार आहेत.
तसेच दुसरीकडे उस्मानाबाद मध्येही राणा दाम्पत्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीवरून आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.