दलित भिकारी नाहीत, तर शिकारी आहेत, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलंय. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील कूचबिहारी भागात झालेल्या हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. या हिंसाचारात ४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आरामबाग विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या सुजाता मंडल खान यांच्यावर अनुसूचित जातीबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. यावरुन त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. आठवलेंनी देखील ट्विट करत सुजाता मंडल यांच्यावर टीका केलीय.
रामदास आठवले म्हणाले, “दलित भिकारी नाही, तर दलित आता शिकारी आहेत. जे दलितांना भिकारी म्हणतात तेच भिकारी आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार सुजाता मंडल यांनी दलितांबद्दल अपशब्द काढल्याबद्दल त्यांचा तीव्र निषेध” व्यक्त करतो.”
पश्चिम बंगाल मधील आरामबाग विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसच्या सुजाता मंडल यांनी अनुसूचित जातीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. याबाबत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सुद्धा निवडणूक आयोगाची भेट घेऊन सुजाता मंडल यांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
हे ही वाचा:
तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत, आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना?
बलात्काराचा आरोपी राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक
टाळेबंदीच्या भीतीने मजूरांचे ‘गड्या आपुला गाव बरा’!
“अनुसूचित जातीतील लोक स्वभावाने भिकारी राहतात. ममता बनर्जी यांनी त्यांच्यासाठी खूप सारं केलं. मात्र, फार थोड्या पैशांसाठी ते भाजपाला आपले मतदान विकत आहेत”, असं वादग्रस्त विधान सुजाता मंडल यांनी केलंय.