सुप्रिया सुळे यांच्या डीआरडीओबद्दलच्या वक्तव्याला मिळाले प्रत्युत्तर

सुप्रिया सुळे यांच्या डीआरडीओबद्दलच्या वक्तव्याला मिळाले प्रत्युत्तर

गुरुवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा सदस्या सुप्रिया सुळे यांचा अधिवेशनात बोलतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुप्रिया सुळे यांनी लस निर्मितीबाबत खोटी विधाने केली आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (डीआरडीओ) खिल्ली उडवल्याचे समोर आले आहे. त्यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादीच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीच ट्विटरवर शेअर केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी डीआरडीओबद्दल वक्तव्य करताना म्हटले की, डीआरडीओ ही एक अग्रगण्य वैज्ञानिक संस्था असूनही ते आता मास्क आणि सॅनिटायझर तयार करत आहेत. तसेच लसी सरकारने नाही तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बनवल्या आहेत, असेही पुढे त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक; व्हेंटिलेटरवर ठेवले

स्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने गुलाम नबी यांना केले ‘आझाद’

‘संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला’

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी

त्यांची ही वक्तव्ये चुकीची असल्याचे अनेक व्यक्तींनी निदर्शनास आणून दिले. शास्त्रज्ञ आनंद रंगनाथन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “सुप्रिया सुळे या सर्वच बाबतीत चुकीच्या आहेत. प्रथम त्यांनी डीआरडीओची खिल्ली उडवली. वस्तुस्थिती ही की डीआरडीओने यूव्ही (UV) आणि मिस्ट सॅनिटायझर्सचा (mist sanitisers) शोध लावला. त्यानंतर त्या म्हणाल्या की, सरकारने ही लस तयार केलेली नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, ICMR ने BB सोबत कोव्हॅक्सीन बनवले आहे,” असे स्पष्टीकरण आनंद रंगनाथन यांनी सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर दिले आहे.

Exit mobile version