मुस्लिम समुदायाची मोठी संख्या असल्यामुळे बिहारमधील कटिहार येथील १०० शाळांत जुम्मा म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी सुट्टी देण्यात येत असून रविवारी या शाळा सुरू असतात, अशी माहिती समोर आली आहे. याआधी झारखंडमध्ये असा प्रकार समोर आला होता. आता बिहारमध्ये हा प्रकार समोर आल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याने म्हटले की, इथे धर्मानुसार शाळेचे नियम बदलले आहेत. शाळेत मुस्लिम मुलांची संख्या जास्त असल्यामुळे सुट्टीचे दिवस बदलले आहेत. टाइम्स नवभारतने ही बातमी दिली आहे. शाळांमध्ये धर्मानुसार सुट्टी दिली जात असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आता जिल्हा शिक्षण अधिकारी देखील त्याला दुजोरा देत आहेत.
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण मंत्री विजय कुमार चौधरी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. इथे वर्षानुवर्षे शुक्रवारीच सुट्टी दिली जात आहे पण धर्मानुसार अशी सुट्टी नको. यात सुधारणा व्हायला हवी.
हे ही वाचा:
… म्हणून तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचे १ ऑगस्टपासून चित्रपट शूटिंगला टाळे
संजय राऊतांविरोधातील जबाब मागे घ्या, अन्यथा… स्वप्ना पाटकर यांना धमकी
संसदेत सोनिया गांधी- स्मृती इराणी भिडल्या! अधीररंजन प्रकरण चिघळले
इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; नागरीक संसदेत घुसले
ही माहिती समोर आली आहे की, सीमेवरील चार प्रमुख जिल्ह्यांमध्ये म्हणजे किशनगंज, अररिया, कटिहार व पूर्णिया येथे ५०० सरकारी शाळांना रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी असते. शिक्षकांचे म्हणणे आहे की, स्थानिक लोक आणि मुस्लिमांच्या दबावामुळे ही सुट्टी शुक्रवारी करावी लागली आहे. या जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ३० ते ७० टक्के आहे. हिंदुस्तान या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार येथील ५०० शाळांत अशी स्थिती आहे. या शाळा प्राथमिक व माध्यमिक आहेत. अररिया येथील जवळपास २४४ शाळांपैकी २२९ शाळांत शुक्रवारी सुट्टी असते.