कोरोनाच्या रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले होते. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे आदेशही देण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा पुढील आठवडाभर बंदच राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शाळा बंद ठेऊन पुण्यातील बगीचे, उद्याने, पर्यटन स्थळे खुली करण्यास मात्र परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाची आकडेवारी अजूनतरी आठ दिवस खाली येणार नाही. त्यात पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी रेट २७ टक्के आहे. त्यामुळे अजूनतरी एक आठवडा शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर वैद्यकीय तज्ज्ञ, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, महापौर या सगळ्यांनी एका मताने निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
‘विहंग गार्डन दंडमाफी बेकायदेशीर, घटनाविरोधी’
प्रजासत्ताक संचलनात आदिवासी चित्रकलेचे दर्शन
कमला इमारत अग्नितांडवात ७ जणांचा मृत्यू; १८ जण जखमी
मुंबईतील भाटिया रूग्णालयाजवळील इमारतीला भीषण आग; १५ जखमी
शाळा बंद ठेवल्या असल्या तरी पुणे महानगर पालिकेच्या हद्दीतील उद्याने सकाळच्या सत्रात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे वेळापत्रकही लवाकरच जाहीर केले जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. लसीचे दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळे आणि पर्यटन स्थळाजवळील दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, गर्दी झालयास निर्बंध लावणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.