शिवभोजन थाळीच्या नावावर दोन घोट ज्युस

शिवभोजन थाळीच्या नावावर दोन घोट ज्युस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वकांक्षी असलेल्या शिवभोजन योजनेत काळाबाजार होत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. राज्यातील गरीब, गरजूंना सवलतीच्या दरात जेवण मिळावे म्हणून राज्य सरकारने शिवभोजन थाळीची योजना आणली. मात्र, प्रत्यक्षात या योजनेच्या नावावर काळाबाजार सुरू असून केंद्र चालवणारे राजकीय दलालच यावर डल्ला मारत असल्याचे समोर आले आहे.

मानखुर्दमधील एका शिवभोजन केंद्रावर ‘झी २४ तास’ची एसआयटी टीम पोहचली असता या केंद्रावर नागरिकांची जेवणासाठी गर्दी असल्याचे चित्र असेल अशी अपेक्षा होती. मात्र, या केंद्रावर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. शिवभोजन थाळीच्या नावावर चक्क लहान मुलांना दोन घोट ज्यूस दिले जात होते. रस्त्यावरच्या लोकांना बोलावून बॅनरसमोर त्यांचे फोटो काढले जात होते.

हे ही वाचा:

अँटिलिया प्रकरणातील नरेश गौरच्या सुटकेचा मार्ग मोकळा

केरळमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या सचिवांची हत्या

२५० कुत्र्यांच्या पिल्लांना मारून माकडांनी घेतला बदला! असे काय घडले होते?

‘विराट कोहलीची वृत्ती आवडते, पण तो खूप भांडतो’

माहिती अधिकाराच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार एकाच व्यक्तीचे वेगवेगळ्या नावाने फोटो अपलोड करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लाभार्थी म्हणून लहान मुलांची नोंद करण्यात आली आहे. याविषयी शिधावाटप उपनियंत्रक कार्यालयाने थोडकी उत्तरे देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत सुरू असलेल्या या घोटाळ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच गेल्या पाच महिन्यांपासून या शिवभोजन केंद्रांना अनुदान न मिळाल्यामुळे ही केंद्रे सुरू ठेवण्यास संचालकांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्र संचालक अडचणीत आले आहेत.

Exit mobile version