27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणबंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाने घेतली दखल

बंगाली हिंदूंच्या प्रश्नावर १५ दिवसांनी न्यायालयाने घेतली दखल

Google News Follow

Related

राज्य सरकारला दिला एक आठवड्याचा वेळ

पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवरील अत्याचाराविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १५ दिवसांनी सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. हजारो हिंदूंचे पलायन आणि अनेक महिलांवर अत्याचार झाल्यानंतर यासंदर्भातील याचिकेची न्यायालय दखल कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु आता न्यायालयाला ही दखल घ्यावीच लागली. पश्चिम बंगाल सरकारला आता या याचिकेवर उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. अनेक महिलांवर बलात्कार झाले. या सगळ्याचे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये वायरल होत आहेत. तरीही ममता बॅनर्जींचे सरकार असा प्रकार घडलंच नसल्याचे सांगत आहे. अशा वेळी आता पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर यांनाच या विषयात लक्ष घालावं लागलं आहे.

निवडणूक निकालांनंतर झालेला प्रचंड हिंसाचार हा राजकीय नाही तर जिहादी मानसिकता दाखविणारा आहे, असा सूर आता उमटू लागला आहे. बंगालमध्ये याआधीही दंगली, जाळपोळ, लुटालूट होत असे पण यावेळी निवडणुकीनंतर झालेले आक्रमण हे प्रामुख्याने हिंदू समाजावर झालेले आक्रमण आहे. भाजपाशी संबंधित विविध व्यक्तींवर झालेले हे सामुदायिक आक्रमण आहे. हे आक्रमण एवढे तीव्र होते की, ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी काम केले, त्यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्यासाठी जेसीबी, बुलडोझरही वापरण्यात आले. ही जिहादी मानसिकता नाही तर काय आहे?

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांनी निदान मुंबईचा तरी दौरा करावा

केरळातील डाव्यांची घराणेशाही उघड

विरोधी पक्षनेत्यांनंतर मुख्यमंत्र्यांना जाग

व्हीव्हीआयपी लस घेतल्याने कुलदीप यादव अडचणीत

महिलांवर बलात्कार, विनयभंगाच्याही घटनांमध्ये या काळात मोठी वाढ झालेली दिसली. महिलांवर अत्याचाराच्या ६६२१ तक्रारी करण्यात आल्या आहेत. २०४२ गावांत अशा लुटालूट, दंगलीच्या घटना प्रामुख्याने घडल्या त्यातील ३०० गावांवर तर या जिहादी आक्रमणाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून आले. विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४१०५ कार्यकर्ते या दंगलखोरांचे लक्ष्य बनले. निवडणूक निकालानंतर झालेल्या या हिंसाचारात ज्यांच्या घरांवर हल्ले झाले, घरे उद्ध्वस्त करण्यात आली, अशा तब्बल ६४०० लोकांना आधार देण्यात आला. या निवडणुकीत काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांचा सफाया झाला आहे. त्यामुळे हा तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजपा असा निवडणुकीतील संघर्ष आहे असे वाटत असले तरी हे एक मोठे युद्ध आहे. जे दीर्घकाळ चालणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा