25 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरराजकारणभाजपामध्ये प्रवेश केलेल्या नवीन जिंदाल यांच्या मातोश्री सावित्री जिंदाल यांचा काँग्रेसला रामराम!

भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नवीन जिंदाल यांच्या मातोश्री सावित्री जिंदाल यांचा काँग्रेसला रामराम!

भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चा

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून सर्वच पक्षांकडून आता मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. अशातच काही बड्या पक्षांमध्ये इनकमिंग देखील सुरू आहे. नुकतेच काँग्रेस नेते नवीन जिंदाल यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपाने त्यांना कुरुक्षेत्र, हरियाणातून उमेदवारीही दिली आहे. अशातच काँग्रेसला आता आणखी एक झटका बसला आहे. नवीन जिंदाल यांच्या मातोश्री आणि देशातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांनीही काँग्रेसची साथ सोडली आहे. बुधवारी त्यांनी सोशल मीडियावर यासंबंधित माहिती दिली आहे.

सावित्री जिंदाल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत असल्याची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “मी आमदार म्हणून १० वर्षे हिसारच्या लोकांचे प्रतिनिधित्व केले आहे. तर, मंत्री म्हणून हरियाणा राज्याची निःस्वार्थपणे सेवा केली आहे. हिसारचे लोक माझे कुटुंब आहेत आणि माझ्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार मी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस नेतृत्वाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांची मी सदैव ऋणी राहीन ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा आणि आदर दिला.” त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर सावित्री जिंदाल या भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत.

सावित्री जिंदाल यांचा मुलगा आणि जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेडचे (जेएसपीएल) चेअरमन नवीन जिंदाल यांनी काही दिवसांपूर्वीचं भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच सावित्री जिंदाल यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत याचा फटका काँग्रेसला बसणार असल्याचे चित्र आहे.

ओपी जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल हिसार मतदारसंघातून आमदार आणि १० वर्षांपासून हरियाणा सरकारमध्ये मंत्री होत्या. जिंदाल यांचे पती आणि जिंदाल ग्रुपचे संस्थापक ओपी जिंदाल यांचे २००५ मध्ये विमान अपघातात निधन झाले आणि हिसार मतदारसंघातून हरियाणा विधानसभेवर सावित्री जिंदाल निवडून आल्या. सावित्री जिंदाल यांनी २००९ मध्ये हिसारमधून पुन्हा निवडणूक जिंकली. ऑक्टोबर २०१३ मध्ये त्यांना हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. २००६ मध्ये त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. मात्र, २०१४ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत सावित्री जिंदाल यांना हिसारमधून पराभवाला सामोरे जावे लागले.

हे ही वाचा:

भिवंडी लोकसभा मतदारसंघाची जागा शरद पवार गटाला दिल्यास सामुहिक राजीनामे देणार

आत्महत्येच्या प्रयत्नानंतर उपचार सुरू असलेल्या एमडीएमके खासदाराचा मृत्यू

“खिचडी चोराचं काम करणार नाही”

वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित

भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत सावित्री जिंदाल यांचे आहे. त्या ८४ वर्षांच्या असून जिंदाल ग्रुपचा व्यवसाय त्या सांभाळतात. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती २९.६ अब्ज डॉलर आहे. जागतिक स्तरावर, सावित्री जिंदाल जगातील अब्जाधीशांच्या यादीत ५६ व्या स्थानावर आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा