मुंबईसारख्या शहरांमध्ये आता मैदान दुरापास्त झालेले आहेत. असे असताना, कुर्ला येथील गांधी मैदान अजूनही मोकळे आहे. परंतु दिवसागणिक वाढणारी अतिक्रमणे यामुळे येथील स्थानिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच आता आंदोलनाशिवाय यांच्याकडे कुठलाच पर्याय उरला नाही. कुर्ला येथील गांधीनगर मैदान हे क्रीडाप्रेमींसाठी एक आशेचे स्थान आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून कुर्ला येथील गांधी मैदानासाठी स्थानिकांचा लढा सुरु आहे. परंतु अजूनही या लढ्याला मात्र यश येताना दिसत नाही. त्यामुळेच आता गांधी मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नुकताच नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये विभागातील क्रीडा मंडळांनी आणि क्रीडाप्रेमींनी हिरीरीने सहभाग घेतला होता. आंदोलनामध्ये स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. तसेच विभागातील तरुण तसेच वृद्धांनीही यामध्ये आवर्जून सहभाग घेतला होता. मैदानातील डागडुजी तसेच इतर अनेक कामे ही जीर्णावस्थेत आहेत.
मैदानासाठी सुरक्षा भिंत उभी करणे, शक्ती मिलच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोडकळीस आलेले व्यासपीठ नीट करणे, तसेच मैदानात सीसीटीव्ही बसवणे अशी मागणी यावेळी होती. मुख्य म्हणजे पालिकेने हे मैदान विकसित करायला हवे अशी रहिवाशांची मागणी आहे.
हे ही वाचा:
अरेरे! चोर समजून केलेल्या मारहाणीत मृत्यू
काय होता इस्रोचा ‘तिसरा डोळा’?
कर्नाळा बँक प्रकरणी खातेदारांना आरबीआयचा निर्वाळा
सध्याच्या घडीला या मैदानाचे दगडी कुंपण तोडण्यात आलेले आहे. तसेच याजागी दरवाजे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेला बाधा निर्माण झालेली आहे.
मैदानामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून वाढती अतिक्रमणे सुरु असल्यामुळे आता स्थानिक संतापले आहेत. याकरता आता स्थानिकांनी आमरण उपोषणाचा इशाराच दिलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हे मैदाना पालिकेला हस्तांतरीक करून पालिकेने या मैदानाची जबाबदारी घ्यायला हवी अशी मागणीच आता स्थानिकांकडून केली जात आहे.