‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करा!’ काँग्रेस नेत्याची मागणी

‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करा!’ काँग्रेस नेत्याची मागणी

‘बांगलादेशमध्ये वाढत चाललेला धार्मिक हिंसाचार ही चिंतेची बाब असून बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करण्यात यावे’ अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या नेत्याने केली आहे. सध्या बांगलादेशमध्ये सुरू असलेला धार्मिक हिंसाचार हा मोठा चर्चेचा विषय ठरत असून त्यात आता काँग्रेसच्या नेत्यांनीही हिंदू रक्षणाची भूमिका घेतल्यामुळे ही चर्चा अधिकच वाढताना दिसत आहे. हिंदू रक्षणासाठी आग्रही असणारे मुंबईतील काँग्रेस पक्षाचे नेते म्हणजे माजी खासदार, केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा

बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसा सुरूच आहे. गेल्या आठवड्यात कुमिलामध्ये दुर्गा पूजा उत्सवांच्या दरम्यान कुराणची अपवित्रता केल्याचा आरोप करून हिंदूंच्या कत्तली सुरु झाल्या. तर रंगपूरच्या पीरगंज उपजिल्ल्यातील एका गावात इस्लामिक जमावाने हिंदूंच्या घरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात हिंदूंची ६० ते ६५ घरे पेटवण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

कोजागिरी पौर्णिमेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?

धर्मांतरविरोधी कायदा करा; विश्व हिंदू परिषदेची मागणी

म्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा

किशनने पेलला धावांचा गोवर्धन

बांगलादेशमधील हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या या धार्मिक हिंसाचाराच्या घटनां विषयी भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. भारतातील नेटकरी या विषयी चीड आणि सांताप तर व्यक्त करतच आहेत पण राजकीय पक्षांचे नेतेही या प्रकरणात बोलताना दिसत आहेत. काँग्रेसचे माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिलेले मिलिंद देवरा यांनी नुकतेच या प्रकरणात ट्विट केले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाने ज्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला तो कायदा आणखीन बळकट करून बांगलादेशमधील हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करावे असे देवरा यांनी म्हटले आहे.

Exit mobile version