भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अतुल भातखळकर यांनी आज ट्विटरवरून जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. १९६३ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेल्या एका मुलाखतीचा संदर्भ देत भातखळकरांनी ही टीका केली. सावरकरांनी दिलेल्या त्या मुलाखतीत त्यांनी नेहरूंची तुलना दुसऱ्या बाजीरावाशी केली होती.
जनाबसेनेसाठी…
१९६३साली दिलेल्या अखेरच्या मुलाखतीत स्वा.सावरकरांना प्रश्न विचारला 'नेहरूंनंतर कोण'?
१९६२च्या युद्धात तोंडावर आपटलेले नेहरू आजारी असल्यामुळे देशभरात ही चर्चा होती.
सावरकर म्हणाले, नेहरूंनंतर कोण हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण या प्रश्नासारखा मला वाटतो. pic.twitter.com/KRlvN2CWwx— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 9, 2021
“जनाबसेनेसाठी… १९६३साली दिलेल्या अखेरच्या मुलाखतीत स्वा. सावरकरांना प्रश्न विचारला ‘नेहरूंनंतर कोण’? १९६२च्या युद्धात तोंडावर आपटलेले नेहरू आजारी असल्यामुळे देशभरात ही चर्चा होती. सावरकर म्हणाले, नेहरूंनंतर कोण हा प्रश्न म्हणजे दुसऱ्या बाजीरावानंतर कोण या प्रश्नासारखा मला वाटतो.” असे ट्विट भातखळकरांनी केले.
नेहरू गांधी परिवारामुळे आज देश टिकून आहे असे विधान काल शिवसेनेकडून करण्यात आले होते. अनेक वर्ष काँग्रेस पक्ष आणि नेहरू गांधी परिवाराविरुद्ध शिवसेनेकडून आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांकडून विधानं करण्यात आली होती. परंतु आज त्याच काँग्रेस पक्षासोबत सत्तेत असल्यामुळे, शिवसेनेवर नेहरू गांधी कुटुंबाची स्तुती करण्याची वेळ आली आहे. याच विधानाचा समाचार घेत, अतुल भातखळकरांनी ट्विटच्या सुरवातीलाच ‘जनाबसेना’ असा शिवसेनेचा उल्लेख केलेला दिसतो.
हे ही वाचा:
पाक समर्थक इम्रान खानला अमेठीत अटक
शिवसेनेच्या प्रदीप शर्मांवरही आता खंडणीचा आरोप
भारताने केलेली मदत कधीही विसरणार नाही- ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान
महाराष्ट्रात सापडले ५३,६०५ नवे कोरोना रुग्ण
दुसऱ्या बाजीरावाच्या नेतृत्वात देखील इंग्रजांशी युद्ध हरून मराठा साम्राज्य लयास गेले होते. १९६३ साली नेहरूंच्या चुकीच्या कूटनीती, परराष्टनिती आणि संरक्षण धोरणांमुळे भारताला चीन विरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळेच सावरकरांनी नेहरूंनंतर कोण? या प्रश्नाचे उत्तर देताना नेहरूंची तुलना दुसऱ्या बाजीरावाशी केली असावी.