22 C
Mumbai
Tuesday, January 7, 2025
घरराजकारण‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन

‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन

सहा आठवड्यांच्या जामीनादरम्यान उपचार करण्याची मुभा

Google News Follow

Related

तुरुंगात असलेले आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. न्यायाधीश जे. के. महेश्वरी आणि न्यायाधीश पी. एस. नरसिंहा यांनी हे निर्देश दिले.

जैन यांना हा जामीन सहा आठवड्यांसाठी देण्यात आला असून त्या दरम्यान ते खासगी इस्पितळात उपचार घेऊ शकणार आहेत. या जामिनासाठी न्यायालयाने काही अटी घातलेल्या आहेत. यादरम्यान जैन यांनी मीडियाशी संपर्क साधून कोणत्याही प्रकारची वक्तव्ये करू नयेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. शिवाय, ज्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे, त्यासंदर्भात साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्नही जैन यांच्याकडून होता कामा नये, असेही न्यायालयाने म्हटलेले आहे.

हे ही वाचा:

‘१ जूनपासून वीजबिल भरू नका’ : कर्नाटकच्या भाजप खासदाराचे आवाहन

असा असेल संसद भवन उदघाटन कार्यक्रम; पूजा, सेंगोल प्रतिष्ठापना, पंतप्रधानांचे संबोधन

मुलुंडच्या व्यावसायिकाचे अपहरण करून विवस्त्र करत केली मारहाण

त्याने तब्बल ९४ हजार एमपीएससी हॉल तिकिटे हॅक केली! 

जैन यांना तुरुंगात असताना बाथरुममध्ये कोसळल्यामुळे दुखापत झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे ते व्हेन्टिलेटरवर होते. २०१७मध्ये जैन दिल्ली सरकारमध्ये मंत्री बनल्यावर त्यांच्यावर सीबीआयने आरोप केले होते. २०१०-२०१२ या कालावधीत त्यांनी ११.७८ कोटी तर २०१५-१६मध्ये ४.६३ कोटींचे मनीलॉन्डरिंग केल्याचा हा आरोप होता. प्रयास इन्फोसोल्युशन्स, इन्डो मेटालिम्पेक्स, अकिन्चन डेव्हलपर्स आणि मंगलयातन प्रोजेक्टसच्या अंतर्गत हे मनीलॉन्ड्रिंग झाल्याचे सीबीआयच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर सीबीआयने केलेल्या तक्रारीवरून ईडीने गुन्हा दाखल केला. ईडीने नंतर जैन यांच्या ४.८१ कोटींची संपत्ती जप्त केली. त्यानंतर जैन यांना अटक करण्यात आली होती. ३० मे २०२२पासून ते तुरुंगात होते.

गेल्या वर्षी न्यायालयाने जैन यांचा जामीन फेटाळला होता. त्यांचा या सगळ्या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय कायम असल्यावरून जामीन देण्यास नकार दिला होता. तर गेल्या महिन्यात दिल्ली उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा