27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणनाशिकमधून सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष अर्ज, काँग्रेसची गोची

नाशिकमधून सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष अर्ज, काँग्रेसची गोची

नाना पटोले यांनी माहिती घेऊन उत्तर देणार असल्याचे सांगितले

Google News Follow

Related

आधीच काँग्रेसची महाराष्ट्रातील अवस्था तोळामासा असताना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नाशिकमध्ये काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी अर्ज भरला नाही पण त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे हे मात्र निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र ते अपक्ष निवडणूक लढविणार असल्यामुळे काँग्रेसची चांगलीच गोची झाली आहे.

रणजीत तांबे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळविणार असल्याचे म्हटले आहे. नाशिकमध्ये तीन उमेदवार अपक्षच आहेत. आता रणजीत तांबे यांना काँग्रेस पाठिंबा देणार का याविषयी संभ्रम आहे.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ही जी घटना घडली आहे ती चांगली घटना नाही असे माझे मत आहे. राजकीय समीकरणात पुढे काय काय होते, ते पाहू. सत्यजीत तांबे हे अपक्ष उभे राहात आहेत त्याचवेळी त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी उमेदवारी असतानाही अर्ज भरला नाही. सुधीर तांबेने यांनी टीव्हीवर दिलेली प्रतिक्रिया मी ऐकली. पण मी यासंदर्भात माहिती घेऊन मग बोलणार आहे. जे काही झाले आहे, त्याचे स्पष्टीकरण मांडू. सुधीर तांबे यांच्याशी आपले काहीही बोलणे झालेले नाही. पण जे घडले आहे त्यावर स्पष्टीकरण देऊ. तांबे पितापुत्रांनी आपल्याला अंधारात ठेवून सदर निर्णय घेतला का, याचीही तपासणी करू.

पटोले म्हणाले की, सत्यजीत तांबे हे अपक्ष उभे राहात आहेत, पण तो त्यांचा प्रश्न आहे. मात्र काँग्रेसने ज्या सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, त्यांनी अर्ज का भरला नाही, याची माहिती आम्ही घेऊ.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा