“होय मीच बॅरिकेड तोडले”

“होय मीच बॅरिकेड तोडले”

किसान मजदूर संघर्ष समितीचे सभासद असलेल्या सतनाम सिंग पन्नू यांनी मुबारका चौक परिसरात सकाळी ८:३० वाजता पहिले बॅरिकेड मोडले. पन्नू यांनी बॅरिकेड मोडल्याची कबुली देत असतानाच लाल किल्ल्यावरील घटनेत त्यांचा हात नव्हता हेही त्यांनी सांगितले.

२६ जानेवारी २०२१ ला दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची सुरुवात ही सकाळी ८:३० वाजता सिंघू बॉर्डरवर झाली. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी आखून दिलेला मार्ग सोडून आंदोलक मध्य दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवण्यासाठी बॅरिकेड्स रचले होते. काही आंदोलकांनी मात्र ही बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. यातील ज्यांनी पहिले बॅरिकेड्स बाजूला सारले त्यांचे नाव सतनाम सिंग पन्नू असे आहे.

एनडीटिव्हीला दिलेल्या मुलाखतीत पन्नू यांनी असे सांगितले की, “आम्ही दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवरून जाण्याचे निश्चित केले होते. परंतु पोलिसांनी आम्हाला अडवल्यामुळे आम्ही बॅरिकेड्स तोडली.”

पन्नू यांनी पुढे असेही सांगितले की, “लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रकारात त्यांचा काहीही हात नव्हता. लाल किल्ल्यावर गेलेल्या लोकांमध्ये दीप सिद्धू आणि त्याचे गुंड होते. पोलिसांनी त्यांना अडवायला हवे होते.”

हे ही पहा: https://www.newsdanka.com/politics/deep-sidhu-hoists-flag-at-red-fort/4171/

बॅरिकेड्स तोडणाऱ्या सतनाम सिंग पन्नू यांनी हिंसेला सुरवात केल्याचे मान्य केले आहे. परंतु त्यांनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचाही प्रयत्न केला आहे.

Exit mobile version