पाच तासांच्या तपासानंतर सतीश उकेंना ईडीने घेतलं ताब्यात

पाच तासांच्या तपासानंतर सतीश उकेंना ईडीने घेतलं ताब्यात

नागपूरमधील वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळी छापेमारी केली. ईडीचे अधिकारी हे सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते. त्यानंतर तब्बल पाच तासांच्या तपासानंतर ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. सतीश उके यांचे बंधू प्रदीप उके यांनाही ईडीने ताब्यात घेतलं आहे. एका जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केल्याचं समोर आलंय.

गुरुवारी सकाळी ५ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्या नागपुरातील पार्वती नगर येथील घरावर छापेमारी सुरू केली. यावेळी काही कागदपत्रे, मोबाईल, आणि लॅपटॉप ईडीने ताब्यात घेतले आहे. तर पाच तासांच्या कारवाईनंतर ईडीने सतीश उके यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ईडीचे नऊ अधिकारी आणि दोन महिला अधिकारी सतीश उके यांच्या घरात दाखल होते. तसेच सीआरपीएफचे जवान त्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आले होते.

शिवसेना खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी नागपूर दौऱ्यावर गेले होते. सतीश उके यांनी त्यावेळी संजय राऊत यांची भेट घेतली होती. उके यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून भविष्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर धाडी पडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

‘भविष्यात नाना पटोले यांच्यावर ईडीच्या धाडी पडल्या तरी आश्चर्य वाटणार नाही’

‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’

व्हीआयपींच्या सेवेत गुंतलेल्या वन अधिकाऱ्यांना कर्तव्याचा विसर!

मेघालयचे म्हणताहेत असा मी ‘आसामी’

सतीश उके हे हायप्रोफाईल वकील आहेत. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. नाना पटोलेंचा गावगुंड ‘मोदी’ याला सतीश उके यांनीच पत्रकार परिषद घेऊन समोर आणले होते.

Exit mobile version