30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणनिवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक

निवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक

न्यूज डंकाचे सल्लागार संपादक आमदार अतुल भातखळकर यांनी पाच राज्यातील निवडणुका आणि पोटनिवडणुकीच्या निकालांचे केलेले सविस्तर विश्लेषण...

Google News Follow

Related

पंढरपुरात राष्ट्रवादीचे भगीरथ भालके हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. त्यांचा दणदणीत पराभव करून भाजपाचे समाधान आवताडे विजयी झाले. ठाकरे सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी या निवडणुकीत ताकद लावली होती. आघाडीचे अनेक मंत्री, स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरात तळ ठोकून बसले होते. पण चुरशीच्या लढाईत आवताडे यांनी विजय मिळवला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना हाताशी धरून ही निवडणूक एकहाती लढली. ठाकरे सरकारच्या अपयशाची लक्तरंच या निवडणुकीत त्यांनी लोकांसमोर काढली. महाराष्ट्रात राजकारणाची दिशा बदलत असल्याचे हे संकेत आहे. परंतु जनतेने मतपेटीद्वारे सणसणीत चपराक देऊनही महाराष्ट्रातले सेक्युलर नेते बंगालच्या वरातीत नाचत आहेत, आपल्या घरात काय झालं यांच्याकडे लक्ष न देता दुसऱ्याच्या वरातीत नाचण्याचा निर्लज्जपणा आणि बेशरमपणा हा फक्त शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यांचे सगळे सहकारी पक्षच करू शकतात.

पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला

आवताडेंनी केले महाविकास आघाडीला उताणे

देशातील आणखी दोन राज्यात लॉकडाऊन

अदर पुनावालांना धमकावणारे शिवसेनेचे गुंड?

पाच राज्यांतील निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित यश आलं नाही ही वस्तुस्थिती आहे, आणि त्या वस्तुस्थितीचा स्वीकार करण्यामध्ये कुठलाही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. ममता बॅनर्जी या एक लढवय्या नेत्या आहेत आणि लढवय्या नेत्याप्रमाणे त्या लढल्या.
अखेर “जो जीता वही सिकंदर” या न्यायाने ममता बॅनर्जीनी तिसऱ्या टर्मला निर्विवादपणे यश संपादन केलं त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.
परंतु हा भाजपाला फार मोठा सेटबॅक आहे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला उतरती कळा लागली आहे असंल फालतू विश्लेषण म्हणजे मोदीविरोधाचा कंड शमवून घेण्याचा केविलवाणा प्रकार आहे.
आज बहुतेक टीव्ही चॅनलवरील डीबेटमध्ये हे चित्र दिसत होते. हे पहिल्यांदा घडलेले नाही. यापूर्वी दिल्ली, बिहार(आधीच्या) विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला अपयश आलेले आहे. तेव्हाही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याचा उद्योग राजकीय पक्ष, मीडिया आणि कथित विचारवंतांनी केला आहे.
बिहारच्या ताज्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सपशेल पराभव झालेला असताना शरद पवार मानभावीपणे देशांमध्ये आता एक तरुण नेतृत्व मोदीजीँना आव्हान द्यायला उभे राहिले आहे असे सांगतात, ते याच मानसिकेतेतून. तेच पं.बंगालबाबत न होते तरच नवल.
पश्चिम बंगालमधल्या भाजपच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना पश्चिम बंगालची सामाजिक, राजकीय परिस्थिती समजून घ्यायला हवी.
२९२ जागा असलेल्या पश्‍चिम बंगालच्या विधानसभेत गेल्यावेळी भाजपला अवघे तीन आमदार निवडून आणता आले होते आणि आज तीन वरून ऐंशीच्या घरापर्यंत भारतीय जनता पार्टीने झेप घेतलेली आहे. पश्चिम बंगाल राज्य हे हिंदी भाषेचा विरोध करणाऱ्या राज्यांपैकी एक. जनसंघ किंवा भाजपा जो विचार मांडला तो पश्चिम बंगालने, कधीच स्वीकारला नाही.
असे असताना सुद्धा गेल्या लोकसभेत अठरा जागा आणि आज ऐंशीच्या घरात जागा मिळवत असताना भारतीय जनता पार्टीने आपल्या विचारांच्या दृष्टीने फार मोठं पाऊल टाकलेल आहे हे निर्विवादपणे मान्य करावच लागेल. ज्या कम्युनिस्ट पक्षाची तीस वर्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ता होती, गेल्या विधानसभेत ज्यांच संख्याबळ सत्तरीच्या पुढे होतं, तो कम्युनिस्ट पक्ष आज पश्चिम बंगालच्या राजकारणातून नामशेष झाला, ही परिस्थिती त्यांच्यावर का ओढवली? याचा मूलभूत विचार त्यांनी करण्याची गरज आहे. ममता बॅनर्जी बाहेर पडल्यानंतर कॉंग्रेस, पश्चिम बंगालमध्ये नाममात्र राहिली.
पश्चिम बंगालसह पाच राज्यातल्या काँग्रेसच्या अपयशामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, एवढे म्हणणे पुरेसे होणार नाही आता काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष तरी राहिला आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे.
ज्या बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या औषधालाही नव्हती, त्या बंगालमध्ये तीन वर्षांपासून सातत्याने मेहनत करून अमित शहा आणि बाकी सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी पक्षाला या निवडणुकीच्या रेसमध्ये आणलं, प्रमुख पक्ष बनवलं हेच भाजपाचे सर्वात मोठे यश आहे. पश्चिम बंगालमध्ये जिथे हिंदी बोलायला सुद्धा विरोध केला जातो, त्या पश्चिम बंगालमध्ये लाखोंच्या हिंदी भाषेतल्या सभा होत होत्या, जय श्रीरामचे नारे लागत होते आणि देशभक्तीने एक वातावरण भारून गेल होतं. मला वाटतं ज्या विचारांकरता भाजपा काम करते त्या विचारांच्या दृष्टीने हे फार मोठं पाऊल आहे आणि त्याच्यामुळे भले त्याच राजकीय संख्येमध्ये परिवर्तन झालं नसेल पण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेला त्याग, अनेक कार्यकर्त्यांनी सांडलेले रक्त या त्यागातून हे कमळ या ठिकाणी फुलल आहे हे आपण विसरून चालणार नाही.
भाजपाने ममता बॅनर्जींच्या कामावर दहा वर्षाच्या विकासकामांवर, भ्रष्टाचारावर आणि घराणेशाहीवर प्रश्नचिन्ह उभं केलं.
हिंसेची मदत घेऊन ममता बॅनर्जींनी ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला हे सत्य भले तथाकथित धर्मनिरपेक्ष सेक्युलर विचारवंत स्वीकारणार नाहीत, पण ममता बॅनर्जी साम-दाम-दंड-भेद सर्व गोष्टींचा वापर करून ही निवडणूक जिंकली हे कसे नाकारता येईल. एकूण लोकसंख्येच्या २७% असलेल्या मुसलमान मतदारांना मुसलमान म्हणून मतदान करा असं आवाहन सुद्धा सेक्युलर ममता बॅनर्जींनी केलं हे आपल्याला विसरून चालणार नाही. ममता बॅनर्जींच्या हुकूमशाही प्रवृत्तीला त्यांच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या धोरणाला भाजपाने चुनौती दिली हे मान्य करावे लागेल.
ज्या ममता बॅनर्जी दुर्गापूजेची परवानगी हायकोर्टमध्ये घेऊन जा असं सांगत होत्या, त्या ममता बॅनर्जींना आता मंदिरांना भेटी द्यायला आणि आपले गोत्र शांडिल्य आहे असे म्हणत फिरावे लागले ते भाजपामुळेच.
आसाम मध्ये भारतीय जनता पार्टीने सत्ता टिकवलीच नव्हे तर घवघवीत यश मिळवलं. आसाम मध्ये पाच वर्षांमध्ये विकासकामांचा झंझावात उभा करून CAA सारखा कायदा आणला. आसाममधल्या सर्व स्तरांतल्या लोकांना मदत करून आसाममध्ये anti-incumbency बाजूला सारून पुन्हा एकदा भाजपने विजय मिळवला हे सुद्धा अत्यंत कौतुकास्पद आहे.
पुद्दचेरीत भाजपला यश मिळालं, त्याच वेळेला तामिळनाडूमध्ये डीएमके एकतर्फी विजय संपादन करेल या मताला धक्का देत, त्याठिकाणी मात्र एआयडीएमके आणि भाजपच्या युतीने आपलं अस्तित्व राखलं ही सुद्धा दुर्लक्ष न करण्यासारखी गोष्ट आहे आणि आसाममधल्या पुन्हा एकदा विजयामुळे पूर्वांचल हा आता भारतीय जनता पार्टीच्या विचारांकरिता पूर्णपणे आपलासा झाला आहे हेच या गोष्टीतून पुन्हा एकदा सिद्ध होते. तामिळनाडूतल्या यशामुळे सुद्धा त्या ठिकाणी दक्षिणेच्या राज्यांमध्ये भाजपा पाय भक्कमपणे रोवते हे लक्षात घेतले पाहिजे आणि त्याचबरोबर केरळमध्ये आधी दोन जागांवर पुढे असलेल्या भाजपाला खाते उघडता आले नाही याची खंत आहेत. पण या पाच निवडणुकींचा जर का निचोड काढायचा असेल तर काँग्रेस पूर्णपणे राजकीयदृष्ट्या समाप्त झाली आहे. ज्या एका केरळमध्ये त्यांना विजयाची आशा अपेक्षा होती तिथे सुद्धा ते विजय प्राप्त करू शकले नाहीत. भारतीय जनता पार्टी ही पूर्वी सारख्याच जोमाने त्या ठिकाणी काम करत राहील आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये एकमेव राष्ट्रीय पक्ष भाजपाच आहे हेच या पाच राज्यातील या निवडणुकीने सिद्ध करून दाखवल आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा