गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर या आंदोलकांसमोर चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना बुधवार, १३ एप्रिल रोजी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सातारा पोलीस हे गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा मिळवणार असल्याची माहिती होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर सदावर्ते यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते.

आज, १४ एप्रिल रोजी सकाळीच सातरा पोलीस आर्थर रोड कारागृहात दाखल झाले होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे त्यांच्या टीमसहित मुंबईत दाखल झाले होते. योग्य त्या कार्यवाहीनंतर सातारा पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेतला आहे. त्यानंतर ६० ते ७० पोलिसांच्या बंदोबस्तात सदावर्ते यांना साताराकडे नेण्यात येत आहे.

साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आले होते. मात्र, तेव्हा ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. अखेर पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्याचे निर्देश आर्थर रोड कारागृह प्रशासनाला दिले होते.

हे ही वाचा:

… म्हणून कंपनीने १०० कर्मचाऱ्यांना कार भेट दिल्या

राज ठाकरे यांनी पत्रकारांना का हाणले ?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित

पाकिस्ताननंतर श्रीलंकेच्या संसदेत येणार अविश्वास ठरावाचा प्रस्ताव

१३ एप्रिल रोजी गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

Exit mobile version