गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलीस घेणार

गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलीस घेणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काही एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर या आंदोलकांसमोर चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची पोलिस कोठडी बुधवार, १३ एप्रिल रोजी संपत आहे. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते आणि इतर आठ जणांना आज पुन्हा गिरगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

गुणरत्न सदावर्तेंची पोलीस कोठडी वाढवून घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करतील तर सदावर्तेंना न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्यांचा ताबा मिळवण्यासाठी सातारा पोलीसही प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर हे त्यांच्या टीमसहित मुंबईत दाखल झाले आहेत.

सोमवार, ११ तारखेच्या सुनावणीत गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर १०९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील लीपिकाला गाडीने उडवले

संजय राऊत म्हणतात, शिवराळ भाषेत माझ्या वेदना

श्रीलंकेने स्वतःला केले दिवाळखोर घोषित!

मुंबईत १० कोटींचा ड्रग्स जप्त, दोन नायजेरियन अटकेत

काही दिवसांपूर्वीच काही एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला होता. या घटनेवेळी घटनास्थळी अपुरी पोलीस यंत्रणा असल्यामुळे अनेक नेत्यांकडून पोलीस यंत्रणेवर टीका करण्यात आली होती.

Exit mobile version