लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते प्रविण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २७ मे २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आज सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जयंती दिनानिमित्त ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचे गाणे प्रदर्शित झाले आहे. भाजपा नेते आणि आमदार नितेशे राणे यांच्या हस्ते हे गाणे प्रदर्शित करण्यात आले.
नितेश राणे यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. “आज दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जयंती दिनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या २७ मे रोजी आपल्या भेटीला येणाऱ्या चित्रपटाचे पहिले गाणे आज माझ्या हस्ते रिलीज करण्यात आले,” अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे.
आज दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जयंती दिनी "सरसेनापती हंबीरराव" या २७ मे रोजी आपल्या भेटीला येणाऱ्या चित्रपटाचे पहिले गाणे आज माझ्या हस्ते रिलीज करण्यात आले..
या अप्रतिम गाण्याची लिंकhttps://t.co/a1vFgUIQd2
परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट.. 🚩🚩 pic.twitter.com/ym6MNgKb3d
— nitesh rane (@NiteshNRane) May 1, 2022
‘हंबीर तू, रणवीर तू समरांगणी…’ असे गाणे आज प्रदर्शित झाले. हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. प्रवीण तरडे यांनी स्वतः कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि अभिनय अशी चौफेर जबाबदारी या सिनेमात पेलली आहे.
हे ही वाचा:
Xiaomi चिनी कंपनीला ईडीचा दणका
‘हुतात्मा स्मारक हे राजकीय विधानं करण्यासाठी नाही तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आहे’
पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा
अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असून, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रवीण तरडे साकारत आहेत. चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांचे असणार आहेत.